Tamil Action Suspense Thriller Movie: 1 तास 58 मिनटांची अंगावर काटा आणणारी फिल्म, 2 हत्या अन् संशयित 25; OTT गाजवतोय 'हा' सिनेमा
Tamil Action Suspense Thriller Movie: 1 तास 58 मिनिटांचा तमिळ अॅक्शन सस्पेन्स थ्रिलर चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित झाला. ज्याचं नाव आहे, टेन अवर्स.

Most Watched Crime Thriller: जर तुम्हाला सस्पेन्स क्राईम थ्रिलर (Suspense Crime Thriller Movie) चित्रपटांची आवड असेल, तर तुम्ही हा चित्रपट पाहायलाच हवा. या चित्रपटात, गुन्हेगारी हत्येची कथा ट्वीस्ट अँड टर्न्ससह दाखवण्यात आली आहे. शेवटपर्यंत ही कथा तुम्हाला खिळवून ठेवते. सिनेमा सुरू झाल्यापासून तुमची पापणी पडतच नाही. खऱ्या खुन्याच्या शोध लागेपर्यंत तुमचा मेंदू अक्षरशः थकून जातो आणि शेवटी जे घडतं, ते हादरवणारं असतं.
1 तास 58 मिनिटांचा तमिळ अॅक्शन सस्पेन्स थ्रिलर चित्रपट (Tamil Action Suspense Thriller Movie) 2025 मध्ये प्रदर्शित झाला. ज्याचं नाव आहे, टेन अवर्स. हा चित्रपट इलयाराजा कालियापेरुमा (Ilayaraja Kaliyaperuma) यांनी दिग्दर्शित केला आहे. ज्यामध्ये सिबी सत्यराज (Sibi Sathyaraj) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात त्यांनी एका इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे,जी कथेतील एका खुनाचं गूढ उलगडण्याचा प्रयत्न करते.
चित्रपटाची कथा काय?
या चित्रपटाची कथा एका प्रामाणिक पोलीस इंस्पेक्टरची आहे. ज्याचं नाव कॅस्ट्रो आहे. चित्रपटाची कथा अशी आहे की, पोलिसांना एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मिळते. तपासादरम्यान, कॅस्ट्रोला कळतं की, मुलीचं अपहरण झालं आहे आणि हे सर्व पूर्वनियोजित होतं. त्याच रात्री एक माणूस पोलीस कंट्रोल रुमला फोन करतो. तो सांगतो की, एका चालत्या बसमध्ये मुलीला टॉर्चर केलं जातंय. तोच माणूस बसचं नाव आणि नंबर प्लेटचे डिटेल्सही देतो. त्यानंतर पोलीस बसचा पाठलाग करतात आणि हायवेवर वायू वेगानं धावणाऱ्या बसला रस्त्याच्या मध्येच थांबवतात.
मग तिला दिसतं की, बसमध्ये एक खून होतो आणि तो माणूस एक मुलगा आहे. पण बसमधील कोणत्याही मुलीला काहीही इजा झालेली नाही. यानंतर, पोलीस बसमध्ये उपस्थित असलेल्या सर्व 25 प्रवाशांना संशयित म्हणून ताब्यात घेतात. यानंतर, पोलिसांना कळतं की, जी व्यक्ती पोलिसांना फोन करून त्या मुलीबद्दल माहिती देत होता, तो दुसरा तिसरा कोणी नसून बसमध्ये मृत्युमुखी पडलेला व्यक्ती होता.
त्यानंतर चौकशीमध्ये काही प्रवाशांवर पोलिसांचा संशय बळावतो. त्यानंतर सिनेमात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येतात. एवढं गुंतागुंतीची कथा होते की, डोकं भंडावून जातं. ही फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर 9 मे रोजी रिलीज झाली आहे. ओटीटीवर येताच या फिल्मनं धुमाकूळ घातला आहे. सध्या प्राईम व्हिडीओवर ही फिल्म टॉप 10 मधल्या तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
ओटीटीवर प्रदर्शित होताच या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जरी हा चित्रपट हिंदी भाषेत उपलब्ध नाही. पण जर तुम्हाला अजूनही तो पहायचा असेल तर तुम्ही इंग्रजी सबटायटल्ससह पाहू शकता. IMDb वर त्याचं रेटिंग 5.8 आहे.
पाहा ट्रेलर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























