Best Thriller Movie On OTT: 10 तास, एक मुलगी अन् धावती बस... OTT वरची डोकं फोडणारी थ्रिलर फिल्म, 1 तास 58 मिनटांमधील एक-एक सीन जबरदस्त
Best Thriller Movie On OTT: थ्रिलर ड्रामानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली तरी, त्याची ओटीटीवर रिलीज होण्याची तारीख जाहीर झाल्यापासून, लोक तो ऑनलाईन पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Best Thriller Movie On OTT: आधी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा लागायचा, पण आता हातातल्या मोबाईलवर आलेल्या ओटीटीमुळे (OTT Released) तुम्ही कधीही, कुठेही तुम्हाला हवा तो चित्रपट किंवा वेब सीरिज (Web Series) पाहू शकता. दर आठवड्याला, साऊथपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक नवनवे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातही एक चित्रपट प्रदर्शित झाला, जो थ्रिलर आणि सस्पेन्सच्या बाबतीत इतर कोणत्याही चित्रपटांपेक्षा कमी नाही.
थ्रिलर ड्रामानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली तरी, त्याची ओटीटीवर रिलीज होण्याची तारीख जाहीर झाल्यापासून, लोक तो ऑनलाईन पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आम्ही ज्या चित्रपटाबाबत बोलत आहोत, तो तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय थ्रिलर ड्रामा 'टेन अवर्स' आहे. जो या वर्षी 18 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
OTT वर प्रदर्शित झालेला 'टेन अवर्स' नेमका कसा?
इलयाराजा कालियापेरुमल दिग्दर्शित 'टेन अवर्स' हा चित्रपट 21 दिवस थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. महिनाभरातच हा चित्रपट ऑनलाईन स्ट्रीम होत असल्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर स्ट्रीम होत आहे.
'टेन अवर्स'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
जरी 'टेन अवर्स'ला समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि IMDb नं त्याला 7.3 रेटिंग दिलं असलं तरी, चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन फारसं चांगलं नाही. मिडिया रिपोर्ट्सनुसार, टेन अवर्सनं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 2 कोटी रुपये कमावले तर चित्रपटाचं बजेट सुमारे 3 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
'टेन अवर्स'ची पटकथा काय?
'टेन अवर्स' हा थ्रीलर ड्रामा आहे. ही कथा एका हत्येची आहे, ज्यामध्ये 25 प्रवासी संशयित आहेत. एका मुलीच्या रहस्यमय खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी, पोलीस स्वतःला 10 तास मागे घेतात आणि ही कहाणी उलगडण्याचा प्रयत्न सुरू करतात. एक बस, एक मुलगी, एका खूनाची आणि 25 प्रवाशांची कहाणी पोलीस उलगडू शकतील की नाही? हा प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या चित्रपटात सिबी सत्यराज मुख्य भूमिकेत आहेत.
पाहा ट्रेलर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























