Mogal Mardini Chatrapati Tararani : नजरेत अंगार अन् हातात तलवार, "मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी"चं पोस्टर आऊट; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Mogal Mardini Chatrapati Tararani : "मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी" या चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरसोबतच चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील घोषणा देखील करण्यात आली आहे.
Mogal Mardini Chatrapati Tararani : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) "मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी" (Mogal Mardini Chatrapati Tararani) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाचं नुकतच एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरसोबतच चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील घोषणा देखील करण्यात आली आहे.
सोनाली कुलकर्णीनं "मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी" या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सोनाली ही छत्रपती ताराराणी यांच्या भूमिकेत दिसत आहे. या पोस्टरमध्ये सोनालीच्या नजरेत अंगार आग अन् हातात तलवार दिसत आहे. या पोस्टरला सोनालीनं कॅप्शन दिलं, "दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली! मुघलहो सांभाळा!! छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान! आपल्या तलवारीच्या पातीवर दिल्लीच्या पातशहालाही नमवणारी "मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी"
पाहा पोस्टर:
View this post on Instagram
कधी रिलीज होणार चित्रपट
"मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी" हा चित्रपट 22 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटात सोनाली छत्रपती ताराराणी यांची भूमिका साकारणार असून अभिनेता आशय कुलकर्णी आणि अभिनेत्री सुरभी हांडे हे देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल जाधव यांनी केलं आहे.
सोनालीचे चित्रपट
नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल या चित्रपटात सोनालीनं महत्वाची भूमिका साकारली. अप्सरा आली या गाण्यामुळे सोनालीला विशेष लोकप्रियता मिळाली. सोनाली ही सोशल मीडियावर तिच्या आगामी चित्रपटांची माहिती चाहत्यांना देत असते. लवकरच सोनाली ही मलाइकोट्टई वालीबान या मल्याळम चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा सोनालीचा पहिलाच मल्याळम भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होत आहे. सोनालीच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: