Video | सन्मान सोहळ्यासाठी Miss India 2020 उपविजेती मान्या सिंह वडिलांच्या रिक्षातून येते तेव्हा...
सोशल मीडियावर या क्षणांचे अनेक फोटो व्हायरल झाले. Miss Indiaच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुनही हे फोटो पोस्ट करण्यात आले.
![Video | सन्मान सोहळ्यासाठी Miss India 2020 उपविजेती मान्या सिंह वडिलांच्या रिक्षातून येते तेव्हा... Miss India 2020 Runner Up Manya Singh Arrives in Her Fathers Autorickshaw for Felicitation Ceremony watch video Video | सन्मान सोहळ्यासाठी Miss India 2020 उपविजेती मान्या सिंह वडिलांच्या रिक्षातून येते तेव्हा...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18013037/mn.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोणत्याही क्षेत्रात केली जाणारी कामगिरी ही अमुक एका व्यक्तीच्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर उभी असते. यातही महत्त्वाची भूमिका बजावत असते ती म्हणजे परिस्थितीची जाण असल्याची भावना. सध्या यंदाच्या वर्षी VLCC Femina Miss India 2020 या सौंदर्य स्पर्धेत उपविजेती ठरलेली मान्या सिंह अशाच प्रकारे सर्वांची मनं जिंकत आहे. यामागचं कारणंही तसंच आहे. एका ऑटोरिक्षा चालकाची मुलगी असणारी मान्या आणि तिचा इथवरचा प्रवास अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय ठरत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे.
सौंदर्यस्पर्धेत अतिशय घवघवीत असं यश संपादन केल्यानंतर मान्याचं कौतुक होण्यासोबतच तिला अनेक ठिकाणी सन्मान समारंभांसाठीही आमंत्रित करण्यात येत आहे. अशाच एका सन्मान सोहळ्यावला हजेरी लावण्यासाठी म्हणून मान्या ठाकूर कॉलेजला पोहोचली होती.
सहसा एखाद्या सन्मान सोहळ्यासाठी जायचं म्हटलं की किमान एखादं स्वत:चं वाहन किंवा मग कॅबचा अनेकजण वापर करतात. पण मान्या मात्र या सोहळ्यासाठी ऑटोरिक्षानं पोहोचली. वडिलांच्या ऑटोरिक्षानं आलेल्या मान्यानं यावेळी पुन्हा एकदा अनेकांची मनं जिंकली. इथं मान्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. इतकंच नव्हे, तर तिची आईसुद्धा या क्षणी अत्यंत भावूक झाली होती.
सोशल मीडियावर या क्षणांचे अनेक फोटो व्हायरल झाले. Miss Indiaच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुनही हे फोटो पोस्ट करण्यात आले. ज्यानंतर कमेंट करत या सौंदर्यवतीवर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
View this post on Instagram
View this post on Instagram
सोशल मीडियावर या क्षणांचे अनेक फोटो व्हायरल झाले. Miss Indiaच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुनही हे फोटो पोस्ट करण्यात आले. ज्यानंतर कमेंट करत या सौंदर्यवतीवर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. मान्याच्या कारकिर्दीचा इथवरचा प्रवास पाहता येत्या काळात आता स्वप्नपूर्तीला मिळालेली गती कायम राखण्यात ती यशस्वी ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्षी पार पडलेल्या Femina Miss India 2020 या स्पर्धेमध्ये तेलंगाणाच्या मानसा वाराणासी हिला जेतेपद मिळालं होतं. तर, हरयाणाच्या Manika Sheokand हिला फेमिना मिस इंडिया ग्रँड या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)