Mika Singh On Salman Khan: 'दोन पेग लावल्यानंतर सलमान खान बदलतो...'; मिका सिंहचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाला?
Mika Singh On Salman Khan: मिका सिंगनं सलमान खानबद्दल अनेक खुलासे केले आहेत. तो म्हणाला की, बॉलीवूडचा भाईजान दारू पिल्यानंतर पूर्णपणे बदलतो. मिकानं सलमानला भेटण्याची योग्य वेळही सांगितली.

Mika Singh On Salman Khan: गायक मिका सिंगचे (Mika Singh) बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानशी (Salman Khan) अत्यंत जवळचे संबंध आहेत. मिका सिंगनं सलमान खानच्या अनेक चित्रपटांमध्ये गाणीही गायली आहेत. त्याचवेळी गायकानं सलमान खानला दिलेल्या मुलाखतीत बोलताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. सलमान खान दोन पेग झाल्यावर दुसराच कुणीतरी बनतो, असं मिका सिंग म्हणाला आहे.
दोन पेग प्यायल्यानंतर सलमान खान बदलतो, मिका सिंग नेमकं काय म्हणाला...?
खरं तर, शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, मिका सिंगनं खुलासा केला की, सलमान खानचे दिवसा आणि रात्री वेगवेगळं व्यक्तिमत्व असतं. संध्याकाळी दोन-चार पेग घेतल्यानंतर सुपरस्टार पाघळतो. तो खूपच भावूक होतो, असं मिका सिंग म्हणाला.
मिका सिंग म्हणाला की, "सलमान भाई रात्री काहीतरी वेगळा असतो आणि दिवसा काहीतरी वेगळा असतो." तो म्हणाला की, "सलमान खान माझ्याशी खूप मोकळेपणानं वागतो. दोन पेग घेतल्यानंतर, तो मला बरोबरीनं वागवतो. पण यामुळे तुम्ही कंफ्युज झालं नाही पाहिजे, तुम्ही दोन पेग घेतले आहेत की चार... तो सलमान खान आहे. समस्या तेव्हा होते, जेव्हा लोक त्यांच्या आयुष्यात खूप लवकर अहंकारी होतात."
View this post on Instagram
मिका सिंगनं सांगितली सलमान खानला भेटायची योग्य वेळ
मिका सिंगनं मीत ब्रदर्स आणि सलमानसोबतच्या भेटीबद्दलचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, "मी ही गोष्ट कधीच सांगितली नाही, पण मीत ब्रदर्सनं एकदा त्याच्यासोबत बिर्याणी खाल्ली होती आणि त्यांना वाटलं होतं की, ते चांगले मित्र बनतील. मला जे माहीत आहे, ते त्यांना माहीत नाही. मला माहीत आहे की, सलमान भाई दिवसा चिडचिड करतात आणि तुम्ही त्यांना संध्याकाळी 6 नंतरच भेटावं, शक्य असेल तर एखाद्या गाण्यासोबत. म्हणून, मीत ब्रदर्सनं रात्री त्यांच्यासोबत बिर्याणी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी ते 'रेस 3'च्या प्रीमियरला गेले."
मिका सिंग पुढे म्हणाला की, "मीत ब्रदर्स एक्सायटेड होऊन उभे होते, सलमान भाईची वाट पाहत होते. तो आला आणि त्यांच्या जवळून गेला. त्यांना आश्चर्य वाटलं की, त्यानं त्यांना नमस्कारही केला नाही की, त्यांच्याकडे पाहिलंही नाही. त्यानी आदल्या रात्री तर एकत्र बिर्याणी खाल्ली होती. मी त्यांना सांगितलं की, ही त्याच्याकडे जाण्याची वेळ नाही. तुम्हाला संध्याकाळपर्यंत वाट पहावी लागेल. दिवसा तो त्याच्या विचारांमध्ये हरवलेला असतो."
मिका आणि सलमानची पहिली भेट कशी झालेली?
सलमानसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना मिका म्हणाला, "मी मूर्ख होतो, मी त्याचे पाय धरून विचारायला हवं होतं की, मी त्याच्यासाठी गाणं गाऊ शकतो का? तो 'जानम समजा करो'च्या शूटिंगसाठी सेटवर होता आणि त्यानं आमच्यासोबत चहाही घेतला होता. पण त्यावेळी मला एवढी समज नव्हती की, मी सलमानचे कॉन्टॅक्ट डिटेल्स घेऊ शकेल. त्यानं मला गायला सांगितलं आणि मी पूर्ण उत्साहानं गायलो. तो नक्कीच विचारात पडला असेल की, हा कोण कार्टून आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























