एक्स्प्लोर

Mayank Lohar Mumbai Local Train Case: 'रेल्वे डब्यात शंभर लोक असतील, घटनेचे व्हिडीओ काढले, पण कुणीच मदत केली नाही'; मयंक लोहार मृत्यूप्रकरणी मराठी अभिनेता संतापला, उदाहरण देत म्हणाला...

Mayank Lohar Mumbai Local Train Case: धावत्या ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार याची निर्घृणपणे भोसकून हत्या करण्यात आली. पावसाचे पाणी डब्यात उडत असल्याने ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली.

Mayank Lohar Virar Local Train Case Actor Swapnil Rajshekhar Reaction: मुंबई (Mumbai News), अनेकजण इथे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. मुंबई लोकल (Mumbai Local) तर मुंबईची लाईफलाईन (Mumbai Lifeline)... पण कधी कुणी विचारही केला नसेल की, लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन एका निष्पाप तरुणासाठी मृत्यूचा सापळा ठरेल. महाराष्ट्राची (Maharashtra News) राजधानी असलेल्या मुंबईतील एका लोकल ट्रेनमध्ये, पावसादरम्यान ट्रेनचा दरवाजा उघडा की बंद ठेवायचा? यावरून मोठा वाद झाला आणि याच वादातून एका तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली.

धावत्या ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार याची निर्घृणपणे भोसकून हत्या करण्यात आली. पावसाचे पाणी डब्यात उडत असल्याने ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली. त्याच्या मृत्यूमुळे विरारमधील लोहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात शोक आणि संतापाची लाट पसरली आहे. अशातच आता याप्रकरणी मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेते स्वप्नील राजशेखर नेमकं काय म्हणाले? (Swapnil Rajshekhar On Mayank Lohar Virar Local Train Case)

स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर मयंक लोहारच्या मृत्यूप्रकरणी पोस्ट शेअर केली आहे. 'रेल्वे डब्यात किमान शंभर लोक असतील... घटनेचे व्हिडीओ निघाले... पण कुणी मयंकला मदत केली नाही, की खुनी पकडला नाही… हे तितकचं गंभीर आहे…', असं स्वप्नील राजशेखर यांनी म्हटलं आहे.

स्वप्नील यांच्या पोस्टवर एका नेटकाऱ्यानं, "स्वप्नीलजी कदाचित त्या मुलाच्या जागी एखादी मुलगी असती तर हिरोगिरी दाखवायला काही जण पुढे आले असते!", अशी कमेंट केलीय. त्यावर उत्तर देत स्वप्नील राजशेखर म्हणाले की, "एक हत्यारबंद माथेफिरू एका मुलीवर बेभान चाकू हल्ला करत असताना एका धाडसी युवकानं पुढे होऊन त्याला हातातल्या सॅकने हाणायला सुरुवात केली… ते पाहुन बाकीचे पाचसहा बघे पुढे झाले... त्यांनी त्या हल्लेखोराला हाणलं, पुढच्यांनी वार करण्यापासून अडवलं अन् मग त्याला पकडून दिलं… अन् बहुदा त्या मुलीचा जीवही वाचला ही हल्लीची घटना प्रसिद्ध आहे… आणि माझा मुद्दा समजून घेणाऱ्याला इतपत पुरेसं आहे…", असं म्हटलंय.

"तो गुन्हेगार डब्यातुन उतरून गर्दीतुन सरळ चालत स्टेशनबाहेर गेला… मग तो त्याच्या इच्छित स्थळी पोहोचला. तिथून मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना 12 तासांनी पोलिसांनी त्याला शोधून पकडलं… पोलिसांनी तत्परता दाखवली नसती तर तो पळून सुद्धा गेला असता… बाकी हिरोगीरी राहू दे, पण ज्या रेल्वे डब्यातून हा खुनी बाहेर पडला त्या डब्यातल्या लोकांनी तो डब्याबाहेर पडल्यावर आरडाओरडा का केला नसेल? बाहेरच्या लोकांना का सांगितलं नाही की, 'तो खुनी चालला आहे, त्याला अडवा…' गदारोळ झाला असता तरी रेल्वे पोलिसांनी तिथेच त्याला पकडलं असतं… बाकी त्यांनी मयंकला मदत केली नाही, खुन्याला वार करताना अडवलं नाही, त्याला पकडलं नाही सगळं मान्य!! एवढंही का केलं नसेल ?!!!' असा सवालही स्वप्नील यांनी केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

दसऱ्यानंतर मनोरंजनाचा धमाका! थिएटरपासून OTT पर्यंत 9 चित्रपट-सीरिज रिलीज होणार, वाचा यादी
दसऱ्यानंतर मनोरंजनाचा धमाका! थिएटरपासून OTT पर्यंत 9 चित्रपट-सीरिज रिलीज होणार, वाचा यादी
Zee Marathi Awards: झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा नामांकन सोहळा दणक्यात पार! मराठी कलाकारांचा जल्लोष; धमाल अन् मनोरंजन
झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा नामांकन सोहळा दणक्यात पार! मराठी कलाकारांचा जल्लोष; धमाल अन् मनोरंजन
Lalit Prabhakar Namdeo Dhasal Look: कसाबच्या भूमिकेचं इंडस्ट्रीत प्रचंड कौतुक, ललित प्रभाकरचा आणखी एक खणखणीत रोल, नामदेव ढसाळांच्या रुपात पाहून व्हाल थक्क, VIDEO
कसाबच्या भूमिकेचं इंडस्ट्रीत प्रचंड कौतुक, ललित प्रभाकरचा आणखी एक खणखणीत रोल, नामदेव ढसाळांच्या रुपात पाहून व्हाल थक्क, VIDEO
Soham Bandekar on Wife Pooja Birari: 'हिच्याकडे मी नोकरी करायला तयार...'; पूजा बिरारीचा बँक बॅलेन्स बघून पती सोहम बांदेकर असं का म्हणाला?
'हिच्याकडे मी नोकरी करायला तयार...'; पूजा बिरारीचा बँक बॅलेन्स बघून पती सोहम बांदेकर असं का म्हणाला?

व्हिडीओ

Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
Ramdas Kadam and Manoj Jarange: उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
Eknath Shinde and Ganesh Naik: गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
Pune Vidhanparishad Election 2026: पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
Sanjay Raut: बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात; अमित शाहा हेच लॉरेंस बिश्नोई...., संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात; अमित शाहा हेच लॉरेंस बिश्नोई...., संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget