एक्स्प्लोर

Zee Marathi Awards: झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा नामांकन सोहळा दणक्यात पार! मराठी कलाकारांचा जल्लोष; धमाल अन् मनोरंजन

Zee Marathi Awards 2026: झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा रंगला नामांकन सोहळा. सोहळ्यातील फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल.

Zee Marathi Awards: कलाकारांच्या (Marathi Actor) मेहनतीचा आणि त्यांच्या लोकप्रियतेचा गौरव करणारा ‘झी मराठी अवॉर्ड्स 2026’ (Zee Marathi Awards 2026) हा छोट्या पडद्यावरील एक मानाचा सोहळा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही या पुरस्कार सोहळ्याची कलाकारांसोबतच प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या ‘झी मराठी अवॉर्ड्स 2026’ च्या नामांकन सोहळ्यातही हीच उत्सुकता, उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. ‘सहलीला जायचं..जायचं सहलीला!’ या थीमवर झालेल्या या सोहळ्यात झी मराठी (Zee Marathi) परिवारातील कलाकारांनी आपल्या हटके आणि स्टायलिश अंदाजाने रेड कार्पेटवर रंगत आणली.

झी मराठी अवॉर्ड्स  2026 चा रंगला नामांकन सोहळा (Zee Marathi Awards 2026 Nominations)

यंदाच्या थीमला साजेसा फुलांचा बहर, पेस्टल रंग आणि फ्रेश लूक्स असा कलाकारांचा अंदाज पाहायला मिळाला. अनेक कलाकारांनी आपल्या लूकमध्ये खास प्रयोग करत स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवली. काहींनी खास डिझाइन केलेले पोशाख परिधान केले, तर काही कलाकारांनी हटके अॅक्सेसरीजने आपला लूक उठावदार केला. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मधील तेजश्री प्रधान म्हणजेच स्वानंदीने सुंदर साडीतील एलिगंट अंदाजात उपस्थिती लावली. तर केतकी कुलकर्णीच्या  फ्लोरल बास्केट ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणारे कलाकार या दिवशी मात्र आपल्या ग्लॅमरस रूपात पाहायला मिळाले. ‘कमळी’ मधील अन्नपूर्णा आज्जी आणि कामिनी, हर्षदा खानविलकर (लक्ष्मी) यांनी मॉडर्न लूकमध्ये रेड कार्पेटवर एंट्री घेतली, तर अदिती सारंगधर (तेजस्विनी खानोलकर), अभिज्ञा भावे (कौशिकी) यांचा कूल अंदाज चर्चेचा विषय ठरला.  दिव्या पुगावकर (जान्हवी), पूर्वा कौशिक (ज्योती), चिन्मयी साळवी (शर्वरी)  यांनी ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये तर अक्षया देवधर (भावना), प्राप्ती रेडकर (सावली), शिवानी सोनार (तारिणी) यांनी आकर्षक वेस्टर्न ड्रेसमध्ये आपला लूक केला. मुलांनीही मागे न राहता फ्लोरल शर्ट्स, जॅकेट्स आणि स्मार्ट कॅज्युअल लूक्समध्ये रेड कार्पेटवर आपली स्टाईल दाखवली.

या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे यांनी सांभाळली. दोघींनी आपल्या मजेशीर अंदाजाने कलाकारांशी संवाद साधत त्यांच्या सहलीच्या आठवणीही जाणून घेतल्या. कलाकारांनी एकमेकांसोबतच्या मजेशीर आठवणी सांगत या सोहळ्याला आणखी रंगत आणली. यानंतर झी मराठी  परिवारातील कलाकारांनी खास रॅम्प वॉक करत आपले लूक्स सादर केले. नामांकन मिळालेल्या कलाकारांना मंचावर बोलावून त्यांना मानाचे पदक देण्यात आले. या पदकाने आगामी पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता आणखी वाढली.

आता नजर लागली आहे ती झी मराठी अवॉर्ड्स 2026 च्या अंतिम पुरस्कार सोहळ्याकडे. कोण ठरणार यंदाचा विजेता? कोणाच्या मेहनतीला मिळणार प्रेक्षकांची पसंती? चला, पाहूया यंदाची बहुप्रतीक्षित झी मराठी अवॉर्ड्स 2026 नामांकन !

सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम 
वेध भविष्याचा 
आम्ही सारे खवैय्ये 
होम मिनिस्टर  
सारेगमप  
 
सर्वोत्कृष्ट मालिका  
तारिणी  
कमळी  
सनई चौघडे  
दीप ज्योती  
वीण दोघांतली ही तुटेना  
कृष्णाईच्या लेकी  
लक्ष्मी निवास  
सावळ्याची जणू सावली  
 
सर्वोत्कृष्ट जोडी 
जय-शर्वरी(सनई चौघडे)
केदार-तारिणी(तारिणी)
हृषी-कमळी (कमळी) 
दीप-ज्योती (दीपज्योती ) 
समर-स्वानंदी(वीण दोघांतली ही तुटेना)
शंकर-गौरी(कृष्णाईच्या लेकी )
सिद्धू-भावना(लक्ष्मी निवास)
सारंग-सावली (सावळ्याची जणू सावली )

सर्वोत्कृष्ट नायिका 
तारिणी(तारिणी)
कमळी (कमळी) 
शर्वरी(सनई चौघडे)
ज्योती (दीपज्योती )
स्वानंदी(वीण दोघांतली ही तुटेना)
गौरी (कृष्णाईच्या लेकी) 
जान्हवी (लक्ष्मी निवास)
भावना (लक्ष्मी निवास)
सावली (सावळ्याची जणू सावली )

सर्वोत्कृष्ट नायक 
सारंग (सावळ्याची जणू सावली )
सिद्धू (लक्ष्मी निवास)
शंकर (कृष्णाईच्या लेकी )
समर (वीण दोघांतली ही तुटेना)
दीप (दीपज्योती )
जय (सनई चौघडे)
हृषी (कमळी)
केदार (तारिणी)

सर्वोत्कृष्ट खलनायिका
भैरवी (सावळ्याची जणू सावली ) 
इंदुराणी (कृष्णाईच्या लेकी) 
मल्लिका (वीण दोघांतली ही तुटेना)  
प्रीती (दीपज्योती) 
कामिनी (कमळी) 
पद्मिनी (तारिणी) 
 
सर्वोत्कृष्ट खलनायक  
राजकुमार (सावळ्याची  जणू  सावली)  
जयंत (लक्ष्मी निवास) 
अंशुमन (वीण दोघांतली ही तुटेना)  
युवराज (तारिणी) 
 
सर्वोत्कृष्ट बालकलाकार  
अबीर (सावळ्याची  जणू सावली) 
ओवी (सावळ्याची  जणू सावली)  
शुभ्रा (सावळ्याची  जणू सावली) 
रमा  (लक्ष्मी निवास)  
आरव (लक्ष्मी निवास)  
इरा (तारिणी) 
 
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन  
संकर्षण कऱ्हाडे(आम्ही सारे खवैय्ये) 
मृण्मयी देशपांडे (सारेगमप) 
अतुल भगरे (वेध भविष्याचा) 
 
तेव्हा बघायला विसरू नका 'झी मराठी अवॉर्ड्स  2026' नामांकन सोहळा 25 ऑक्टोबर, रविवार संध्या 7:00 वा सदैव तुमच्या झी मराठी वाहिनी वर.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Soham Bandekar on Wife Pooja Birari: 'हिच्याकडे मी नोकरी करायला तयार...'; पूजा बिरारीचा बँक बॅलेन्स बघून पती सोहम बांदेकर असं का म्हणाला?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Manjrekar on Nana Patekar: 'एक त्रास देणारी गोष्ट म्हणजे... नाना पाटेकरांच्या निधनानंतर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, 'नानांचं शेवटचं दर्शन'
'एक त्रास देणारी गोष्ट म्हणजे... नाना पाटेकरांच्या निधनानंतर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, 'नानांचं शेवटचं दर्शन'
Pooja Birari: 'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
Sunil grover on Tukaram Mundhe: 'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
Sameer Wankhede: 'आजही मला अन् क्रांतीला पाकिस्तानमधून धमक्या येतात'; समीर वानखेडेंचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाले?
'आजही मला अन् क्रांतीला पाकिस्तानमधून धमक्या येतात'; समीर वानखेडेंचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
Embed widget