एक्स्प्लोर

Narayan Surve :  कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....

Narayan Surve :  आपल्या कवितांमधून शोषित वंचित कष्टकरी वर्गाच्या वेदना मांडणारे कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या घरी चोराने चोरी केली. पण, या चोराला उपरती झाली आणि त्याने चोरी केलेले सगळे सामान परत केले. विशेष म्हणजे या चोराने एक चिठ्ठी लिहित सुर्वे कुटुंबीयांची माफी मागितली

Narayan Surve :  आपल्या कवितांमधून शोषित वंचित कष्टकरी वर्गाच्या वेदना मांडणारे कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या घरी चोराने चोरी केली. पण, या चोराला उपरती झाली आणि त्याने चोरी केलेले सगळे सामान परत केले. विशेष म्हणजे या चोराने एक चिठ्ठी लिहित सुर्वे कुटुंबीयांची माफी मागितली आहे. दिवंगत कवी नारायण सुर्वे यांची मुलगी आणि जावई रविवारी घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.

‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली...’असे सांगत आपल्या वाटेला आलेल्या आयुष्याच्या विद्यापीठाने दिलेले संघर्ष, हालअपेष्टा यांचे चित्रण कवी नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेतून मांडले. आयुष्याच्या अखेरपर्यंत नारायण सुर्वे यांनी आपले शब्द, साहित्य  शोषित वंचित घटकांसाठी खर्च केले. त्याच नारायण सुर्वे यांच्या नेरळ येथील घरी चोराने डल्ला मारला. मात्र, आपण चोरी केलेले घर हे नारायण सुर्वे यांचे आहे, हे समजताच त्याने माफीनामा लिहून घरातून चोरलेल्या सगळ्या वस्तू पुन्हा घरी आणून ठेवल्या.

नेरळ येथील गंगानगर परिसरात दिवगंत कवी नारायण सुर्वे यांचे घर आहे. सध्या या घरात त्यांची मुलगी सुजाता आणि जावई गणेश घारे राहतात. घारे दाम्पत्याने सुर्वे यांच्या सर्व स्मृती या घरात जपून ठेवल्या आहेत. घारे दाम्पत्य दहा दिवसांसाठी मुलाकडे विरार येथे गेले होते. घर बंद असल्याचे हेरत चोराने शौचालयाची खिडकी फोडून सुर्वे यांच्या घरात प्रवेश केला. मात्र, घरात कोणतेही दागिने, पैसे चोराला सापडले नाहीत. त्यामुळे चोराने घरातील एलईडी टीव्ही, तांब्या-पितळ्याच्या वस्तू, भांडी तसेच धान्याकडे मोर्चा वळवला. सलग दोन-तीन दिवस चोर घरातील साहित्यावर डल्ला मारत होता. 

मात्र, चोराला घराच्या भिंतीवर नारायण सुर्वे यांचा फोटो दिसला. त्याच वेळी त्यांना मिळालेली मानपत्रे,स्मृतीचिन्हे, पुरस्कार दिसले. आपण चोरी करत असलेले घर हे नारायण सुर्वे यांचे असल्याचे चोराला समजले. त्यानंतर आपल्या कृतीचा पश्चाताप या चोराला झाला. आपल्या चुकीची उपरती झालेल्या या चोराने घरातील सगळ्या वस्तू पुन्हा आणून ठेवल्या. चोरून नेलेला एलईडी टीव्ही पुन्हा भिंतीवर लावला आणि सोबत एक चिठ्ठी लिहित आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. 

चोराने पत्रात काय म्हटले?

मला माहिती नव्हते की, नारायण सुर्वे यांचे घर आहे, नाही तर मी चोरी केली नसती. मला माफ करा. मी, जी वस्तू तुमची घेतली आहे ती मी परत करत आहे. मी टीव्ही पण नेला होता परंतु आणून ठेवला. सॉरी...

पोलिसांकडून तपास सुरू

या चोरीच्या प्रकरणी नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोराने आणून ठेवलेल्या वस्तूंवरील बोटांचे ठसे, सीसीटीव्ही यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे माहिती नेरळ पोलिसांनी दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Baramati : नातवाच्या प्रचारासाठी आज्जी मैदानात, प्रतिभाताई पवार युगेंद्रच्या प्रचारातMuddyach Bola Yeola Constituency : छगन भुजबळांच्या मतदारसंघातून 'मुद्याचं बोला'Asaduddin Owaisi Exclusive : माझी प्रत्येक वस्तू-बॅग चेक करा, देशप्रेमाशिवाय काही सापडणार नाहीAvinash Jadhav Thane Vidhan Sabha | हातात फलक घेऊन एकदा संधी द्या, अविनाश जाधवांचं ठाणेकरांना आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Embed widget