एक्स्प्लोर

Super Duper Marathi Film On OTT: बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून ललित प्रभाकरच्या सिनेमाची OTT वर एन्ट्री; कुठे पाहाल?

नाती जपणे किती महत्त्वाचे आहे, एकमेकांची काळजी कशी घ्यावी आणि कुटुंबाचा खरा अर्थ काय आहे हे हा चित्रपट सांगतो.

Supar Dupar Marathi Movie On OTT: बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून "सुपर डुपर" चित्रपट आता झी 5 मराठीवर प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली आता हा चित्रपट ओटीटी वरून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.  या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार मंडळी तर आहे सोबतीला तरुणाईचा आवडता अभिनेता ललित प्रभाकर देखील आहे चित्रपटाबद्दल बोलताना ललितने खास भावना शेयर केल्या आहेत. 

खऱ्या आयुष्यात असं घडलं तर वेद होईन- ललित

ललितने पहिल्यांदा चित्रपटाची कथा ऐकल्यावर त्याची प्रतिक्रिया काय होती याबद्दल बोलताना तो सांगतो "जेव्हा मी ही कथा पहिल्यांदा ऐकली तेव्हा मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे बऱ्याच दिवसांनी एक खरा कौटुंबिक एन्सेंबल चित्रपट ऐकायला मिळाला. चित्रपटातील विनोद मला खूप आवडला, जरी कथेत एक दुःखाची छटा देखील होती. चित्रपटाची संकल्पना आणि विषय मला खूप भावला. या चित्रपटाच्या केंद्रस्थानी एक घर आहे, आणि मला वाटते की घर हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे हा विषय माझ्याशी खूप जवळून जोडला गेला.

पुढे ललितला रोहित अचानक एका संपूर्ण कुटुंबासोबत घर शेअर करू लागतो. तुमच्या खऱ्या आयुष्यात असे झाले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? यावर ललित सांगतो "जर माझ्या खऱ्या आयुष्यात असे काही घडले, तर मी नक्कीच वेडा होईन. एक गोष्ट मात्र निश्चित आहे. काहीही झाले तरी मी इतक्या लोकांनी भरलेल्या घरात सतत राहू शकणार नाही. कदाचित मी गच्चीवर जाऊन थोडा वेळ एकांतात घालवेन. पण खरं सांगायचं तर, इतक्या गर्दीच्या घरात राहणं माझ्यासाठी खूप कठीण जाईल. असं ललित म्हणाला.

हा सीन करताना आलेली सर्वाधिक मजा 

शूटिंगदरम्यानचा असा एखादा मजेशीर किस्सा सांगताना ललितने खास किस्सा संगतीला "एक सीन आहे ज्यामध्ये मी घराबाहेर येतो आणि अचानक समोर अस्वल पाहतो, तर घरातील सगळे माझ्याकडे धक्कादायक नजरेने पाहत असतात. तो सीन शूट करताना मला खूप मजा आली, कारण त्यात एकही संवाद नव्हता. सगळा खेळ फक्त रिअॅक्शन्सचा होता. प्रत्येकाने आपल्या हावभावांमधून आणि टायमिंगमधून अप्रतिम काम केले.

तो सीन पाहायलाही खूप मजेशीर होता, कारण आम्ही तो शूट करताना खरोखरच खूप एन्जॉय करत होतो. विशेष म्हणजे त्या सीनमध्ये वापरलेला टॉवेल ही माझी कल्पना होती. सुरुवातीला स्क्रिप्टमध्ये अंडरवेअरचा उल्लेख होता, पण मी दिग्दर्शकांना टॉवेल वापरण्याची सूचना केली, कारण त्यामुळे अधिक विनोदी प्रसंग निर्माण करता येतील असे मला वाटले. त्यांनी ती कल्पना मान्य केली आणि त्यानंतर आम्ही काही मजेदार गोष्टी त्या सीनमध्ये जोडल्या, पण कुठेही अश्लीलता येणार नाही याची काळजी घेतली. संपूर्ण कलाकारांसोबत तो सीन शूट करताना अगदी कुटुंबासोबत वेळ घालवल्यासारखे वाटले. ही आठवण माझ्यासाठी कायम खास राहील. एक खास सीन आहे जो मला खूप आवडला. तो एक मोनोलॉग होता आणि आम्ही तो मूळतः एका टेकमध्ये आणि एका शॉटमध्ये शूट केला होता. एडिटिंगदरम्यान काही अतिरिक्त शॉट्स जोडले गेले, पण अभिनय करताना तो पूर्णपणे एका दमात साकारला होता.

चित्रपटाचा विषय काय?

तो मोनोलॉग आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारा होता आणि तो सादर करताना मला खूप मजा आली. एक अभिनेता म्हणून त्या सीनमध्ये मला खूप काही करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे तो अनुभव अधिकच खास बनला.ललितने प्रेक्षकांना चित्रपटात एक वेगळी बाजू दाखवली असून सुपर डुपरमधील कोणती गोष्ट प्रेक्षकांना सर्वात जास्त रिलेट होईल अस वाटत याबद्दल तो सांगतो "माझ्या मते हा चित्रपट आपल्या आजूबाजूच्या माणसांचे महत्त्व, आपण निर्माण केलेली नाती आणि आपल्या आयुष्यातील संबंध यांवर प्रकाश टाकतो. ही नाती जपणे किती महत्त्वाचे आहे, एकमेकांची काळजी कशी घ्यावी आणि कुटुंबाचा खरा अर्थ काय आहे हे हा चित्रपट सांगतो.

हा विषय अतिशय भावनिक आणि सर्वांनाच जवळचा वाटणारा आहे. त्यामुळे तो प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल, असे मला वाटते. अभिनेता म्हणूनही या चित्रपटात मला खूप काही साकारण्याची संधी मिळाली, त्यामुळे हा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी अधिक समाधानकारक ठरला. आम्ही आणखी उत्साहित आहोत कारण काही कारणांमुळे थिएटरमध्ये चित्रपट पाहू न शकलेल्या अनेक लोकांना आता तो घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. हा असा चित्रपट आहे जो पुन्हा पुन्हा पाहिला तरी कंटाळा येत नाही.आता हा चित्रपट थेट तुमच्या घरी पोहोचत आहे. तुम्ही तो तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत, मुलांसोबत कधीही पाहू शकता. हा एक संपूर्ण कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे आणि आम्हाला खात्री आहे की मराठी ZEE5 वरही त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळेल.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget