एक्स्प्लोर

Neha Shitole On Vivek Agnihotri Statement On Marathi Food: वरण-भात, कढीला 'गरिबांचं जेवण' म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रीवर मराठी अभिनेत्रीची आगपाखड; खडे बोल सुनावत म्हणाली...

Neha Shitole On Vivek Agnihotri Statement On Marathi Food: दिग्दर्शक आणि मराठी अभिनेत्री पल्लवी जोशीचा नवरा विवेक अग्निहोत्रीनं मराठी जेवणावर केलेल्या वक्तव्यानंतर नेहा शितोळेनं लांबलचक पोस्ट लिहून राग व्यक्त केला आहे.

Neha Shitole On Vivek Agnihotri Statement On Marathi Food: 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files), 'द बंगाल फाईल्स' (The Bengal Files) फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) त्यांच्या सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे नाहीतर, त्यांनी मराठमोळ्या खाद्यपदार्थांवर, मराठी जेवणावर केलेल्या वक्तव्यामुळे. मराठी लोकांचं जेवण म्हणजे, गरिबाचं जेवण, असं म्हणत विवेक अग्निहोत्रींनी मराठी जेवणाची (Maharashtriyan Food) खिल्ली उडवली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विवेक अग्निहोत्री एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मराठी जेवणाची तुलना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीसोबत केली आहे. यावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी, मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशीला (Marathi Actress Pallavi Joshi) घेरलं आहे. 

'कर्ली टेल्स'च्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री हे मराठी लोकांचं जेवण म्हणजे 'गरिबांचं जेवण' असं म्हणाले. वरण-भात, कढी याला त्यांनी नावं ठेवली. यावरुन चोहिकडून विवेक अग्निहोत्रींवर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच मराठमोळी अभिनेत्री नेहा शितोळे हिनंही आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेहानं सोशल मीडियावर पोस्ट करुन संताप व्यक्त केला आहे. हा माणूस 'गरिबांचं' किंवा 'किसानांचं' जेवण म्हणजे, वाईट असं म्हणून अन्नाचा, शेतकऱ्यांचा आणि भारताची जवळ जवळ 25 टक्के जनता जी दारिद्र्य रेषेखाली राहते, त्यांचा अपमान करतोय, असं नेहा शितोळे म्हणाली.   

View this post on Instagram
 
A post shared by NEHA SHITOLE (@nehanachiket)

नेहा शितोळे पोस्टमध्ये नेमकं काय म्हणालीय? 

हा व्हिडिओ पाहून माझा प्रचंड संताप होत आहे. एक एक करून सांगते... 

1. मराठी जेवणाविषयी पर्यायाने संस्कृती विषयी वाट्टेल ते बोलतोय हा माणूस... पुढे अजुन एका रील मधे हा म्हणतोय की मी सात्विक अन्न खातो... (Plant based food) (ह्याला सावजी खायला घाला आणि तांबडा पांढरा रस्सा पाजा एकदा)

2. "गरिबांचं" किंवा "किसानांचं" जेवण म्हणजे वाईट असं म्हणून अन्नाचा, शेतकऱ्यांचा आणि भारताच्या जवळ जवळ 25% जनतेचा जी दारिद्र्य रेषेखाली राहते त्यांचा अपमान करतो आहे... 

3. आपल्या सगळ्यांची लाडकी पल्लवी जोशी हसून हसून हा विनोद अभिमानाने सांगते आहे... आणि मुळात आम्ही भाज्या फक्त उकडत नाही... उकडीचे मोदक सिंपल नाहीत... पुरणपोळी सिंपल नाही... 

4. ज्यांच्या घरी असं जेवण जेवतात, अश्या मुलीशी कसं लग्न करायचं हा विवेक अग्निहोत्री ला पडलेला प्रश्न आहे... 

5. आणि हे सगळं YouTube च्या माध्यमातून करोडो लोकं बघतायत... 

हा माणूस काश्मीर चं सत्य आपल्या समोर आणतो आहे म्हणून आपण ह्याला डोक्यावर घ्यायचं? ज्या माणसाच्या मनात मुळात इतका भेदभाव आणि चुकीच्या धारणा आहेत भारतातल्या एका राज्याबद्दल, तिथे राहणाऱ्या आणि कष्ट करून कमावून खाणाऱ्या लोकांबद्दल तो काय दुसऱ्या राज्याचं सत्य सांगणार आपल्याला??? आता मराठीचा झेंडा मिरवणाऱ्या सगळ्यांनी ह्याचे सिनेमे Boycott करायला नकोत का? जसा स्टँड अप कॉमेडियन लोकांना "धडा शिकवण्याचा" आपण प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाल्याची पण ग्वाही दिली तसा आता ह्यांना कोण शिकवणार "वरण भाताची" किंमत आणि महत्त्व??? ह्या आणि अशा लोकांमुळे खरंतर मराठी भाषेला, माणसाला आणि पर्यायाने संस्कृतीला धोका आहे कारण हे पॉवर पोझिशन मध्ये बसून मराठी लोकांविषयी, भाषेविषयी वाईट, निंदनीय आणि अपमानकारक वक्तव्य करतात... त्यामुळे नाही म्हणलं तरी अनेक स्तरांवर लोकांच्या मनात कळत नकळत परिणाम होतो आणि आपण वरवर च्याच गोष्टी (theatre मिळत नाही, मराठी अनिवार्य नाही, मराठी कंटेंट OTT स्वीकारत नाही... इत्यादी) साठी भांडत बसतो... 

का भीती वाटते आपल्याला आपल्यापेक्षा जास्त मोठ्या माणसाशी पंगा घ्यायची... त्यापेक्षा दुकानदारांना, कष्ट करून जगणाऱ्या गरीब परप्रांतियांना धमकावणं आणि मारणं सोपं आहे नाही का??

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

VIDEO : मराठी लोकांचा वरण भात म्हणजे 'गरीब किसानों का खाना', दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने गरळ ओकली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Embed widget