Marathi Actress Madhavi Nimkar On Cosmetic Surgeries: 'बोटॉक्स, फिलर्स... यात काही चुकीचं मला वाटत नाही'; कॉस्मॅटिक सर्जरीवर काय म्हणाली नॅचरल ब्युटी माधवी निमकर?
Marathi Actress Madhavi Nimkar On Cosmetic Surgeries: 'सुख म्हणजे नक्की काय असतं..' मालिकेतली खलनायिका अभिनेत्री माधवी निमकर तिच्या फिटनेससोबतच तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.

Marathi Actress Madhavi Nimkar On Cosmetic Surgeries: कॉस्मॅटिक सर्जरी (Cosmetic Surgery), सुंदर दिसण्यासाठी घेतली जाणारी औषधं आणि इतर ब्युटी ट्रिटमेंट या गोष्टींचा सर्रास वापर फिल्म इंडस्ट्रीत केला जातो. काही दिवसांपूर्वी 'काँटा लगा फेम गर्ल...' शेफाली जरीवालाचा (Shefali Jariwala) अचानक मृत्यू झाला. तिच्या मृत्यूसाठी ब्युटी ट्रिटमेंट्स (Beauty Treatments) आणि त्यासाठीची औषधं जबाबदार असल्याचं बोललं गेलं. नेहमीच याबाबत अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळतात. काही ब्युटी ट्रिटमेंट्सच्या बाजून असतात, तर काही या सगळ्या ट्रिटमेंट्स आणि औषधांच्या विरोधात. अशातच आता मराठमोळ्या अभिनेत्रीनं या सर्वांवर मौन सोडलं आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं..' मालिकेतली खलनायिका अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nimkar) तिच्या फिटनेससोबतच तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. माधवीचे योगाभ्यास करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. तिचा नॅचरल ब्युटी म्हणूनही ओळखलं जातं. अशातच आता माधवी निमकरनं महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्स, बोटॉक्स, फिलर्स याबाबतचं आपलं मत स्पष्ट केलं आहे.
नेमकं काय म्हणाली माधवी निमकर?
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना 'सुख म्हणजे नक्की काय असतं..' फेम शालिनी म्हणजेच, मराठी अभिनेत्री माधवी निमकर म्हणाली की, "बोटॉक्स, फिलर्स किंवा अजून काहीही जे आजकाल कलाकारच नाही तर सामान्य मुलीही करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला वाटतं की चेहरा किंव शरीर हे कलाकाराचं असेट आहे. विशेषत: अभिनेत्रींसाठी ते महत्वाचं आहे. अभिनय बघून आणि त्यांचा चेहरा बघून प्रेक्षकांना एखादी अभिनेत्री आवडते. पण जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की मला माझ्या सौंदर्यात अजून बदल करायचे आहेत. चेहऱ्यात काहीतरी चांगलं दिसत नाहीए म्हणून जर एखादीने सर्जरी केली तर त्यात काय चुकीचं आहे? दिसण्यासाठीच करतायेत ना. त्यांना अजून सुंदर दिसण्यासाठी, मेंटेन राहण्यासाठी करत असतील तर त्यांनी का करु नये? कलाकारांना सौंदर्य टिकवायचं आहे त्यामुळे त्यांना वाटत असेल तर त्यांनी करावं."
"आज बोटॉक्स किंवा सर्जरी करणाऱ्या कितीतरी अभिनेत्रींना आपण आवडीने बघतो. तिने बोटॉक्स केलंय, प्लास्टिक बॉडी आहे असं म्हणून आपण त्यांना बघणं सोडून देतो का? मलाही अनेक अभिनेत्री दिसायला आवडतात. पडद्यावर चांगलं दिसणं महत्वाचं आहेच ना. मग यात काही चुकीचं मला वाटत नाही. मला स्वत:ला अजून काही सर्जरी करण्याची गरज वाटत नाही किंवा मी करेनच असं नाही. पण जे करतात त्यांच्याबद्दल मला काहीच वाटत नाही. जर एखाद्याचा आत्मविश्वास वाटत असेल तर त्यांनी ते करावं. हा फक्त ते धोकादायक नाही ना किंवा त्याचा काही दुष्परिणाम नाही ना इथपर्यंत ते ठीक आहे.", असं माधवी निमकर म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























