एक्स्प्लोर

Marathi Actor Vaibhav Mangale Post Viral: कोकणात बायंगं नावाचं भूत असतं, ते बसल्याजागी सगळं आणून देतं पण जाताना निर्वंश करुन जातं; वैभव मांगलेंची सूचक पोस्ट व्हायरल

Marathi Actor Vaibhav Mangale Post Viral: कॉकरोच पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज, अश्रुधूरांचा वापर करण्यात आला. तसेच काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याच्या घटना घडल्या.

Marathi Actor Vaibhav Mangale Post Viral: 20 जुलै रोजी दिल्लीत (Delhi News) 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janta Party) या संघटनेनं संसदेकडे मोर्चा काढत मोठं आंदोलन केलं. हे आंदोलन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Parliament Monsoon Session) पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेलं. मागील सुमारे महिनाभर जंतरमंतरवर (Jantar Mantar Delhi) सुरू असलेल्या आंदोलनाचा हा पुढचा टप्पा होता. आंदोलकांनी जंतरमंतरवरून संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न करताच, पोलिसांनी त्यांना अडवलं. आंदोलनाच्या आदल्या रात्रीच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जंतरमंतरवर पाहायला मिळाला. यावेळी लाठीचार्ज, अश्रुधूरांचा वापर, तसेच काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याच्या घटना घडल्या.

खरंतर 20 जूनपासूनच दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू होतं. 'कॉकरोच जनता पार्टी' नावानं सुरू झालेल्या आंदोलनाला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळालाय. 20 जुलै रोजी संसद मार्चचं आवाहन करण्यात आलेलं, ज्यात देशभरातून विद्यार्थी, तरुण आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यात आलाय. अशातच आता या आंदोलनाला देशभरातून पाठींबा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेते वैभव मांगले यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांची ही पोस्ट सोनम वांगचूक यांची उपोषण आणि कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन यांच्याशी जोडली जात आहे.  

वैभव मांगले यांनी फेसबुकवर नेमकी काय पोस्ट केलीय? (Vaibhav Mangale Facebook Post)

वैभव मांगले यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, "कोकणात बायंगं नावाच भूत असतं म्हणे ते आपल्या भल्या साठी घरी आणतात म्हणे, ते सगळं घरबसल्या तुम्हाला आणून देतं म्हणे.पण ते परत जाताना तुमच्या प्रिय गोष्टी घेऊन जातं , निर्वंश करून जातं. खरंय का हे ????" 

अभिनेते वैभव मांगले यांनी पोस्ट करताना ना कुणाचं नाव घेतलंय ना कुणाचा उल्लेख केलाय. कोकणातल्या एका ऐकीव गोष्टीचा उल्लेख त्यांनी यात केलाय. पण, त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. कुणी त्यांना या प्रथेबाबत माहिती देतंय, तर कुणी त्यांची ही पोस्ट थेट कॉकरोच जनता पार्टीनं जो सरकारविरोधात एल्गार केलाय, त्याच्याशी जोडतंय.

Marathi Actor Vaibhav Mangale Post Viral: कोकणात बायंगं नावाचं भूत असतं, ते बसल्याजागी सगळं आणून देतं पण जाताना निर्वंश करुन जातं; वैभव मांगलेंची सूचक पोस्ट व्हायरल 

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या नेमक्या काय? 

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा कराव्यात.
रिपोर्ट्सनुसार, पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुटकेचीही मागणी आंदोलनात करण्यात आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Chaityabhumi Protest : चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली; आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget