Good News | शशांक केतकरच्या घरी येतोय खराखुरा सँटाक्लॉज
सहसा ख्रिसमस म्हटलं की, सँटाक्लॉजचा उल्लेख येतोच. शशांकनंही त्याचा उल्लेख केला आहे. फक्त उल्लेखच नव्हे, तर आपल्या जीवनात खराखुरा सँटाक्लॉज लवकरच येणार असल्याचं त्यांनं जाहीर केलं आहे.
मुंबई : नाताळ सणाच्या अर्थात ख्रिसमस (Christmas 2020)च्या निमित्तानं सर्वत्र आंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतानाच एक अतिशय आनंदाची बातमी अभिनेता शशांक केतकर यानं सर्वांसोबत शेअर केली आहे. नाताळची पार्श्वभूमी देत शशांकनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियासह कलाविश्वातही अनेकांचं लक्ष वेधत आहे.
सहसा ख्रिसमस म्हटलं की, सँटाक्लॉजचा उल्लेख येतोच. शशांकनंही त्याचा उल्लेख केला आहे. फक्त उल्लेखच नव्हे, तर आपल्या जीवनात खराखुरा सँटाक्लॉज लवकरच येणार असल्याचं त्यांनं जाहीर केलं आहे.
शशांक आणि त्याच्या पत्नीच्या जीवनात, त्यांच्या या सुरेख नात्यात आनंदाची बरसात करण्यासाठी येणारा हा सँटाक्लॉज म्हणजे त्यांचं बाळ. पत्नी प्रियांका हिच्यासोबतचा एक गोड फोटो शशांकनं शेअर केला आहे. ज्यामध्ये या दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे.
फोटोच्या कॅप्शनमध्ये शशांकनं लिहिलंय, 'सँटा येतो आणि भेटवस्तूंची भरभरुन उधळण करतो, हे आम्हाला ठाऊक होतं. पण, तो आमच्याच जीवनात येईल याची कल्पनाच आम्हाला नव्हती. त्यासाठी आम्ही खरंच आभारी आहोत. या सुट्ट्यांच्या आनंददायी दिवसांच्या तुम्हा सर्वांना आम्हा तिघांकडून खुप साऱ्या शुभेच्छा'.
View this post on Instagram
शशांकनं सोशल मीडियावर त्याच्या पत्नीच्या गरोदरपणाची Good News शेअर केल्यानंतर त्याच्यावर चाहते आणि कलाकार मित्रांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला. 2017 मध्ये शशांक आणि प्रियांका विवाहबंधनात अकडले होते. कलाविश्वातील सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत मराठी कलाविश्वातील ही गोड जोडी कायमच सर्वाचं मन जिंकत असते.