एक्स्प्लोर

Gaurav More: गौरव मोरेनं गुपचूप उरकलं लग्न, अजूनही लपवून ठेवलं, कारण काय? अभिनेता म्हणाला, 'काही गोष्टी...'

Gaurav More Gets Married in Private Ceremony: मुलाखतीत पॅडी कांबळेनं गौरव मोरेचं कौतुक केलं. तसेच गौरवच्या पत्नीला पहिल्यांदा भेटल्यानंतरचा किस्सा सांगितला.

Maharashtra Hasyajatra Actor Gaurav More Secret Wedding: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम (Maharashtrachi Hasyajatra) गौरव मोरेनं (Gaurav More) गुपचूप लग्न केलं अन् सिनेसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांना सुखद धक्का बसला. मराठी कलाकारांनी शेअर केलेल्या फोटोंमुळे गौरव मोरेनं लग्न केलं (Wedding) आणि नवीन घरही घेतलं, ही माहिती समोर आली. गौरवला चाहत्यांसह सिनेकलाकारांनी पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या. विनोदी कलाकार पॅडी कांबळे यांनीही गौरव मोरेला शुभेच्छा दिल्या.  तसेच गौरव मोरेच्या पत्नीबद्दलही भाष्य केलं.  एका मुलाखतीत पॅडी कांबळे आणि गौरव मोरेनं नवीन घराबद्दल भाष्य केलं. 'ही फिलिंग  शब्दांत सांगणं कठीण आहे', असं गौरव मोरे म्हणाला. 

गौरव मोरे आणि पंढरीनाथ कांबळे यांनी 'आऊट ऑफ  Syllabus' या सिनेमाच्या पोस्टर आणि म्यूझिक लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती.   यावेळी दोघांनी इट्स मज्जाला मुलाखत दिली होती.  सध्या गौरव मोरेची चर्चा त्याच्या लग्नामुळे आणि त्यानं  घेतलेल्या नवीन घरामुळे होत आहे.  या मुलाखतीत गौरव मोरेला  त्याच्या नवीन घराबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर अभिनेता म्हणाला,  'ही फिलिंग शब्दांत सांगणं कठीण आहे.  गृहप्रवेश केल्यापासून  असं  वाटतं की,  त्याच ठिकाणी बसून राहावं', असं गौरव मोरे म्हणाला. 

पॅडी कांबळेकडून गौरव मोरेचं कौतुक (Paddy Kamble reaction on Gaurav More marriage)

गौरव मोरेच्या नवीन घराबद्दल पॅडी कांबळे म्हणाला, 'आपण बरेच  वर्ष आई बाबांच्या घरात राहत असतो. पण जेव्हा आपण आपल्या आई - वडिलांना नव्या घरात घेऊन जातो, तेव्हा तो आनंद खूप वेगळा असतो', असं पॅडी कांबळे म्हणाला. यावेळी पॅडी कांबळेनं गौरव मोरेचं कौतुकही केलं.  'सुरुवातीला गौरवला विनोदावरुन  नावं ठेवली असेल,  पण जेव्हा कुणी विनोद करुन अभिनेता होतो आणि आपण त्या व्यक्तीला सिनेमांमध्ये बघतो, तेव्हा लोकांना त्याचं कौतुक वाटतं. हा ब्रँड आणखी मोठा होईल', असं म्हणत पॅडी कांबळेनं गौरवचं कौतुक केलं.

गौरवच्या लग्नाबद्दल पॅडी कांबळे म्हणाला, 'गौरवची मैत्रीण आहे, हे मला ठाऊक होतं.   आम्ही  नुकतंच Switzerlandला गेलो होतो. आमच्या वेगळ्या कार्यक्रमासाठी आम्ही गेलो होतो. तेव्हा ती याला सोडायला आली होती. तेव्हा तिला मी पहिल्यांदा भेटलो. मी आधी फक्त ऐकून होतो.   मला इतकं रडू आलं होतं तेव्हा.. पण काही गोष्टी जोपर्यंत होत नाही,  म्हणजे त्याच्या घराचं जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्यानं पोस्ट केलं नव्हतं. त्यानं अजूनही डिसक्लोज केलेलं नाही.  जेव्हा ऑफिशियली गोष्टी होतील, तेव्हा गौरव नक्कीच सांगेल', असं पॅडी कांबळे म्हणाला.

गौरवने गुपचूप लग्न उरकलं, याबाबत अभिनेता म्हणाला, 'काही गोष्टी सिक्रेट ठेवणं चांगलं असतं.  त्यावेळेनुसार,  बाहेर येतीलच', असं गौरव मोरे म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget