Manisha Koirala Learns Secret Between Death And Rebirth: मृत्यू आणि पुनर्जन्मात गुरफटलीय 55 वर्षांची शाहरुख खानची 'ही' अभिनेत्री; दोन वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर तरीही...
Manisha Koirala Learns Secret Between Death And Rebirth: 'बार्डो' तिबेटियन बौद्ध धर्मामध्ये मृत्यू आणि पुनर्जन्माच्या मधली स्थिती आहे, ज्याचा अर्थ आहे मृत्यु आणि पुनर्जन्म काय आहे आणि त्यांच्यात जीवनाचा खरा अर्थ काय आहे? याच विषयावर मनीषा कोइरालानं सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इन्साग्रामवर आपला अनुभव शेअर केला आहे.

Manisha Koirala Learns Secret Between Death And Rebirth: संजय लीला भन्साळीनी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शिक केलेल्या 'हीरामंडी : द डायमंड बाजार'मध्ये (Heeramandi) दमदार अॅक्टिंगच्या जोरावर डिजिटल डेब्यू करणारी मनीषा कोइराला (Manisha Koirala) आजही अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. या दरम्यान, अभिनेत्रीला जीवन आणि मृत्यूचं रहस्य समजून घ्यायचंय. तिनं तिबेटियन बौद्ध शिक्षक आणि लेखक योंगे मिंग्युर रिनपोछे यांच्यासोबत या रहस्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे. मनीषा कोइरालाला 'बार्डो'बाबत जाणून घ्यायचं होतं. 'बार्डो' तिबेटियन बौद्ध धर्मामध्ये मृत्यू आणि पुनर्जन्माच्या मधली स्थिती आहे, ज्याचा अर्थ आहे मृत्यु आणि पुनर्जन्म काय आहे आणि त्यांच्यात जीवनाचा खरा अर्थ काय आहे? याच विषयावर मनीषा कोइरालानं सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इन्साग्रामवर आपला अनुभव शेअर केला आहे.
मनीषा कोइरालानं तिबेटियन बौद्ध शिक्षकासोबत फोटो पोस्ट केलेले. कॅप्शनमध्ये लिहिलेलं की, "मला नेहमीच मृत्यूला समजून घ्यायचं होतं, मला वाटलं की, हे खऱ्या अर्थानं जाणून घेतलं तर माझी त्याबाबतची भितीही दूर होईल... माझा शोध मला 'द तिब्बती बुक ऑफ लिविंग एंड डाइंग'पर्यंत घेऊन गेलेत, जिथे एका वाक्यानं मला प्रभाविक केलं की, "तुम्हाला तसंच मरणं मिळतं, जसं तुम्ही जगलात..."
View this post on Instagram
मनीषा कोइरालानं सांगितलं की, ज्यावेळी तिचा शोध तिबेटियन बौद्ध शिक्षक आणि लेखक योंगे मिंग्युर रिनपोछे यांना भेटून संपला, ज्यांच्या क्लासेस मार्फत जीवनात योग्य लक्ष्य आणि मृत्यू आणि पुनर्जन्म यांच्यातील अवस्थेबाबत समजतं. त्यांनी लिहिलंय की, "मिंग्युर रिनपोछे एक दुर्लभ गुरू आहेत, त्यांचा आनंद, विनम्रता आणि सर्वात खोल ज्ञान देखील सोपं आणि स्पष्ट करतं. ती केवळ शब्दांद्वारेच नाही तर अनुभवाद्वारे देखील शिकवते..."
अभिनेत्रीच्या पोस्टवरून हे स्पष्ट होतं की, तिला जीवन आणि मृत्यूच्या पलीकडे जाऊन गहन आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालंय. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, मनीषा कोइराला नियमितपणे धार्मिक नेते दलाई लामा यांना देखील भेटते. मनीषा कोइराला यांनी अलीकडेच ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. तिनं तिच्या पदवी समारंभाचा व्हिडीओ देखील पोस्ट केला. तिनं हे शिक्षण केवळ पदवी मिळविण्यासाठी घेतलेलं नाही तर आयुष्यभर शिकत राहण्याची मानवी प्रवृत्ती वाढवण्यासाठी केलंय. ही अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























