Actor Wife Leaves Home: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
Akhil NRD Wife: अखिल एनआरडीची पत्नी बंस कंडक्टरसोबत पळून गेली असल्याचा दावा.

Akhil NRD In Shock Wife Leaves Home: केरळ (Kerala) येथील अलाप्पुझामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मल्याळम कंटेंट क्रिएटर आणि अभिनेता अखिल एनआरडी (Akhil NRD ) सध्या आपल्या वैयक्तिक आयु्ष्यामुळे चर्चेत आहे. अखिल एनआरडीची पत्नी त्याला सोडून गेल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सने असा दावा केला आहे की, अभिनेत्याची पत्नी आपले सामान घेऊन फरार झाली आहे. ती एका बसं कंडक्टरसोबत गेली असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, या घटनेसंदर्भातील एक व्हिडीओ (CCTV Footage) सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेमकं घडलं काय? जाणून घेऊयात.
अभिनेत्याची बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली (Akhil NRD In Shock As Wife Megha Reportedly Leaves Home)
अखिल एनआरडी आणि मेघा यांच्याबाबत बातमी समोर येताच सोशल मीडियात अक्षरश: खळबळ उडाली. रिपोर्ट्सनुसार, मेघा आपले सामान घेऊन घरातून निघून गेली आहे. यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. नेटकरी तसेच अखिलच्या चाहत्यांनी विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, अखिलने याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. तसेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यापासून तो लांब राहिला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सीसीटीव्ही फुटेज आहे. हा व्हिडीओ अखिलची पत्नी मेघाचा असल्याचं बोललं जात आहे.
View this post on Instagram
या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्यावर उभी आहे. रस्त्यावर कुणीही नाही. एक महिला बॅग घेऊन त्या व्यक्तीसोबत जाते. मागून एक कार येते. चारचाकीची लाईट सुरू होते. दोघेही कारमध्ये बसतात अन् कार निघून जाते. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ मेघाचाच आहे की, आणखी कुणाचा हे अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ अखिलची पत्नी मेघाचाच असल्याचं म्हणत आहेत.
अखिलचा अत्यंत जवळचा मित्र आणि पूर्व बिग बॉस कंटेस्टेंट साई कृष्णा याने या प्रकरणाचा उलगडा केला. त्याने आपल्या युट्यूब व्हिडीओतून याचा खुलासा केला. त्यानं व्हिडीओत सांगितलं की, 'ही गोष्ट ऐकून जबरदस्त धक्का बसला. साई कृष्णाने सांगितलं की, तो दोघांच्या लग्नातही उपस्थित होता. 2021 पासून साई कृष्णा अखिलचा मित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अखिल आणि मेघा हे एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत होते. नोव्हेंबर 2024 साली दोघांनी लग्न केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























