Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Mahima Makwana journey: महिमा मकवाना हिनं आपल्या संघर्षाच्या काळातील दिवसांचा खुलासा केला.

Mahima Makwana journey of becoming actress: बरेच कलाकार आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिने इंडस्ट्रीत (Film Industry) येतात. परंतु, महिमा मकवाना (Mahima Makwana) हिनं आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. सध्या अभिनेत्रीची चर्चा तिची नवीन सिरीज 'मुसाफिर कॅफे' (Musafir Cafe)मुळे होत आहे. महिमाने आपल्या कारकिर्दीत ओटीटी, सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम केलं आहे. महिमा आपल्या मर्जीने अभिनेत्री झाली नाही. परिस्थितीने तिला अॅक्टिंग करण्यास भाग पाडले.
महिमा मकवाना हिचा संघर्षमयी प्रवास (Mahima Makwana Struggle Story)
2021 साली रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना महिमा म्हणाली, 'जेव्हा माझे वडील वारले तेव्हा मी केवळ 5 महिन्यांची होती. तेव्हा माझी आई एनजीओमध्ये काम करत होती. माझा भाऊ 9 वर्षांचा होता. माझ्या आईला अभिनेत्री व्हायचं होतं. पण ती अभिनेत्री नाही होऊ शकली. म्हणून तिनं अभिनयात मला ढकलले. मी नऊ वर्षांची असल्यापासून ऑडिशन देत आले आहे. मला दुनियादारी कळत नव्हती. मी शाळेतील अर्धा दिवस भरुन ऑडिशन देण्यासाठी जात होते. मी थकून घरी यायची. पण मला आई यासाठी प्रोत्साहन देत राहिली'.
'या इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यामागचं मोठं कारण म्हणजे, मला कुटुंबाचा आधार व्हायचे होते. या जबाबदारीमुळे माझं बाळपण हिरावले गेले. मी इतर मुलांसारखं स्कूल आणि कॉलेजचं आयुष्य नाही जगू शकले. माझ्या घरी कमावणारंही कुणी नव्हतं. आम्ही चाळीत राहत होतो. समाज आणि नातेवाईकही आमच्याकडे तुच्छतेच्या नजरेने पाहत होते', असं अभिनेत्री म्हणाली. अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं की, 'आईला मरण्यापूर्वी माझे स्वत:चे घर पाहायचे होते. 2012 साली झी टीव्हीवरील 'सपने सुहाने लडकपन के'ही मालिका मिळाली. तेव्हा मी अवघे 13 वर्षांची होती. या मालिकेमुळे आर्थिक परिस्थिती झपाट्याने बदलली', असं अभिनेत्री म्हणाली.
'मी जेव्हा 14 वर्षांची होती, तेव्हा मी माझे घर घेतले. पहिली कारही घेतली. पण यामुळे माझं बालपण हिरावलं गेलं. मी केवळ परीक्षा देण्यासाठी शाळेत जात होते. मी लवकर मोठी होत गेले', असंही अभिनेत्री म्हणाली. टीव्ही इंडस्ट्रीत मु्ख्य भूमिका साकारण्यापूर्वी अभिनेत्रीने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं. सुरुवातीच्या दिवसांत निराशा मिळाली. कारण चाइल्ड आर्टिस्टला कमी पैसे मिळत होते. मागच्या वर्षी अभिनेत्रीने मुंबईत दुसरे घर खरेदी केले. डोक्यावर वडिलांचे छत्र नसूनही, अभिनेत्रीने 26 व्या वर्षी इतकं काही मिळवलं.






















