एक्स्प्लोर

Famous Youtuber Found Dead In Georgia: ट्रॅव्हल व्लॉगसाठी जॉर्जियाला गेला अन् कुटुंबीयांशी संपर्क तुटला; प्रसिद्ध युट्यूबरचं निधन, फॉलोअर्स हादरले

Famous Youtuber Found Dead In Georgia: प्रसिद्ध युट्यूबरचं निधन झालं आहे. त्याच्या निधनाच्या बातमीनं फॉलोअर्सना धक्का बसला आहे.

Famous Youtuber Found Dead In Georgia: प्रसिद्ध युट्यूबरच्या (Youtuber) निधनानं सध्या खळबळ माजली आहे. प्रसिद्ध थाई युट्युबर (Famous Thai YouTuber) 'ह्लुन सोलो' (Hlun Solo) यांचं वयाच्या 27 व्या वर्षी निधन झालंय. व्हिडीओ कंटेंटच्या शुटिंगसाठी सोलो जॉर्जियाला गेला होता. यावेळी तो सतत कुटुंबीयांच्या संपर्कात होता, पण अचानक एक दिवस त्याचा त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला आणि त्यानंतर त्याच्या निधनाची बातमी समोर आली. त्याच्या निधनाबाबत सांगताना कुटुंबीयांनी सांगितलं की, 30 जुलै रोजी त्याचं निधन झालंय.

30 जुलै रोजी निधन (Youtuber Hlun Solo Found Dead)

ह्लुन याचं खरं नाव 'बोवोर्नथॅट पेंगसुक' (Bovornthat Pengsuk) होतं. ते 'ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर' होते. 13 जुलैपासून त्याचा त्याच्या कुटुंबाशी संपर्क होत नव्हता. त्यानंतर, त्याना शोधण्यासाठी कुटुंबानं सोशल मीडियावर मदतीचं आवाहन केलेलं. अनेक दिवस कोणतीही माहिती मिळाली नसल्यानं त्याचे फॉलोअर्स सतत विचारणा करत होते, अखेर त्याच्या कुटुंबानं त्याच्या निधनाचं वृत्त जाहीर केलं. 

युट्यूबरचा मृतदेह परत आणण्यासाठी तयारी सुरू

थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, मृतदेह परत आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याकरता ते अंकारा (तुर्की) येथील रॉयल थाई दूतावास आणि जॉर्जियामधील स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करत आहेत. याव्यतिरिक्त, प्रसिद्ध युट्यूबरच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी थाई अधिकारी जॉर्जियाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. माहिती विभागाचे महासंचालक आणि प्रवक्ते जतेचाई अपकर्नीतिकसेत यांनी सांगितलं की, अंकारा येथील रॉयल थाई दूतावासातील अधिकारी स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जॉर्जियाला गेले होते आणि तिथेच या मृत्यूची पुष्टी झाली.

निधनाच्या वृत्ताला कुटुंबीयांकडून दुजोरा 

माध्यमांशी बोलताना हलुनची 82 वर्षीय आजी, सोम प्लेंगसुक यांनी सांगितलं की, त्यांना आशा होती की, तिचा नातू सुखरूप असेल आणि पूर्वीच्या प्रवासांप्रमाणेच लवकरच घरी परत येईल. त्यांनी सांगितलं की, त्या आदल्या दिवशी आणि रात्री सतत त्याच्याबद्दल चिंतेत होत्या आणि त्याच्याविषयीच्या बातम्यांची वाट पाहत होत्या. जॉर्जियाची राजधानी तिबिलिसी इथल्या एका हॉटेलमध्ये त्यानं आत्महत्या केल्याचा जो दावा सध्या सोशल मीडियावर केला जातोय, तो हलुनच्या आजींनी फेटाळून लावला. त्याच्या मृत्यूच्या नेमक्या परिस्थितीबद्दल स्पष्ट माहिती मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, त्या युट्युबरचा भाऊ सोमसाक वुत्सारी यानं सांगितलं की, आदल्या रात्री अनेक सोशल मीडिया युजर्सकडून त्याला हलुनच्या मृत्यूबाबतचे संदेश मिळाले होते. दरम्यान, कुटुंब सध्या कॉन्सुलर कागदपत्रांची वाट पाहत आहे, ती मिळाल्यावर पुढील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. या कठीण काळात कुटुंबाच्या भावनेचा आणि गोपनीयतेचा आदर करावा, तसेच लोकांनी पडताळणी न केलेली माहिती पसरवू नये किंवा तर्क-वितर्क करू नयेत, असं आवाहन कुटुंबानं केलं आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Famous Youtuber Found Dead In Georgia: ट्रॅव्हल व्लॉगसाठी जॉर्जियाला गेला अन् कुटुंबीयांशी संपर्क तुटला; प्रसिद्ध युट्यूबरचं निधन, फॉलोअर्स हादरले
ट्रॅव्हल व्लॉगसाठी जॉर्जियाला गेला अन् कुटुंबीयांशी संपर्क तुटला; प्रसिद्ध युट्यूबरचं निधन, फॉलोअर्स हादरले
Ramayan Part 1 Ranbir Kapoor: 'रामायण: पार्ट 1' मधून प्रेक्षकांना मोठं सरप्राइज, रणबीर कपूर साकारतोय डबल रोल, प्रभू श्रीराम व्यतिरिक्त 'या' भूमिकेत झळकणार
'रामायण: पार्ट 1' मधून प्रेक्षकांना मोठं सरप्राइज, रणबीर कपूर साकारतोय डबल रोल, प्रभू श्रीराम व्यतिरिक्त 'या' भूमिकेत झळकणार
Medha Manjrekar cancer: 'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
Embed widget