Avinash Narkar fathers death: 'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
Avinash Narkar on father: अविनाश नारकर यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत वडिलांच्या निधनानंतरचा भावूक प्रसंग सांगितला

Avinash Narkar on Father Death: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar). आपल्या मालिका आणि रिल्समुळे हे जोडपे कायम चर्चेत असतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अविनाश नारकर यांनी वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी वडिलांच्या निधनानंतरचा (Avinash Narkar Father Death) भावूक प्रसंगही सांगितला. वडिलांचे निधन आणि आईचा भावूक हंबरडा, हे पाहून अविनाश नारकर प्रचंड भावूक झाले होते.
वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला प्रसंग (Avinash Narkar Gets Emotional After Fathers Death)
अविनाश नारकर यांनी अलिकडेच 'Its Majja Marathi'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी वडील हे जग सोडून गेल्यानंतरचा किस्सा सांगितला. अविनाश नारकर म्हणाले, 'पहाटे माझ्या वडिलांचं झोपेतच निधन झालं होतं. मला मित्र शोधत आले होते. मला एका मित्राने सांगितलं की, 'चल तात्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं आहे' मला तेव्हा धक्का बसला. आम्ही निघालो. मित्रांनी हॉस्पिटलला न नेता, घराकडे नेलं. मी तेव्हा विचारलं की, घराकडे का? तेव्हा मित्र म्हणाले की, आधी आईला भेटून येऊयात'.
'चाळीत मी एन्ट्री केली. आमची तेव्हा सिंगल रुम होती. आत मध्ये आलो, पाहिलं तर समोर वडिलांचं शव ठेवलं होतं. आणि आई शेजारी बसली होती. आईने मला बघितलं आणि हंबरडा फोडला. 'आता माझ्या अविची बक्षिसं कुणाला दाखवू', असं म्हणत आई ढसा ढसा रडू लागली. त्यावेळी मी खचलो. त्यावेळी मला कळालं की, वडील जरी मला कधी सांगत नसतील, पाठीवर थाप मारत नसतील, तरी सुद्धा ते माझ्याविषयी आईकडे बोलत होते. माझी आई त्यांना मला मिळालेली बक्षीसं दाखवत होती. त्या दोघांमध्ये माझ्या कौतुकाचा संवाद होत होता', असं अविनाश नारकर म्हणाले. 'माझ्या वडिलांसोबत माझा जास्त संवाद होत नव्हता. पण आठवी, नववी, दहावीपर्यंत मी त्यांच्याजवळ झोपायचो. माझ्या केसांना तेल आणि मालिश केल्याशिवाय बाबा कधी झोपले नाहीत', असं अविनाश नारकर म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Varsha Usgaonkar on Husband: वर्षा उसगांवकरांचे पती काय करतात? अभिनेत्री पतीसोबत फोटो का शेअर करत नाही? म्हणाल्या...
Singer Rimi Tomy Second Marriage: प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा






















