एक्स्प्लोर

Nimish Kulkarni New Marathi Film: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; निमिष कुलकर्णीच्या आगामी सिनेमाचं नाव काय?

Nimish Kulkarni on New Film: 'द्विधा' मधून निमिष कुलकर्णी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात! सिनेमा रिलीज कधी होणार?

Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कॉमेडी शोमधून घराघरात पोहोचलेला कलाकार म्हणजे निमिष कुलकर्णी. त्याने आपल्या सहजसुंदर अभिनयशैली आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.  ‘मर्डरवाले  कुलकर्णी’ या मराठी नाटकानंतर हिंदी चित्रपट 'अग्नि'मध्ये (Entertainment) निमिष झळकला होता. सध्या 'सनई चौघडे' मालिकेतील त्याच्या गाजणाऱ्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता तो 'द्विधा' या आगामी मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. हा सिनेमा 21 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी झळकणार नव्या मराठी सिनेमात (Nimish Kulkarni on New movie Dwidha marathi movie)

आदित्य (आदि) व्यक्तिरेखा या चित्रपटात तो साकारत आहे. मनाने प्रेमळ, समजूतदार आणि विश्वासू असलेला आदि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा शांत आधार आहे. आदि हा श्रावणीचा आत्येभाऊ. बालपणापासून एकत्र वाढल्यामुळे त्यांच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि अनेक सुंदर आठवणींची घट्ट वीण आहे. तो इतरांप्रमाणे जास्त बोलत नाही; पण प्रत्येकाच्या मनातील न बोललेले भाव अचूक ओळखण्याची त्याच्यात विलक्षण संवेदनशीलता आहे. कधी कधी सर्वात मोठा आधार हा मोठ्या शब्दांत नव्हे, तर शांतपणे आपल्या माणसांच्या सोबत उभे राहण्यात असतो, याची जाणीव आदि आपल्या त्याच्या व्यक्तिमत्त्वातून करून देतो. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nimish Kulkarni (@inimishk)

आपल्या व्यक्ती रेखाबद्दल निमिष कुलकर्णी म्हणतो, ‘द्विधा' हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात दडलेल्या भावनांचा प्रवास आहे. या चित्रपटात माझी भूमिका साकारताना अनेक भावनिक पैलू अनुभवायला मिळाले. निलेश नाईक सरांची संवेदनशील मांडणी आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप समृद्ध करणारा ठरला. प्रेक्षकांनी माझ्यावर आतापर्यंत भरभरून प्रेम केलं आहे. 'द्विधा'मधील माझी ही भूमिका देखील त्यांना नक्कीच आवडेल, अशी आशा मला आहे."

'द्विधा' या आगामी मराठी चित्रपटात बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार पद्धतीने उलगडण्यात आला आहे. 

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे असून, निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत. चित्रपटात सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार,आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

जॉन अब्राहमकडून चाहत्यांसाठी गुड न्यूज, मुंबईतील पॉश परिसरात खरेदी केला बंगला, किंमत ऐकून थक्क व्हाल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Advertisement

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget