Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Ghost Actress Ananya Raj: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या राज हिचं महिनाभरापूर्वी निधन झालं होतं.

Ananya Raj Death at 35: 'घोस्ट' (Ghost) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री अनन्या राज (Ananya Raj) आज आपल्यात नाही. तिने वयाच्या 35 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी तिच्या कुटुंबियांनी अनन्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर शेअर करत दिली आहे. मुख्य म्हणजे अनन्या राजच्या मृत्यूच्या एक महिन्यानंतर कुटुंबाने पोस्ट (Instagram post) शेअर करुन याची माहिती दिली. 'अनन्या राजचा मृत्यू 15 जुलै रोजी सकाळी झोपेतच झाला. ती बराच काळ शारीरिक तसेच मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होती', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, तिच्या निधनानंतर नेटकऱ्यांना धक्का बसला. पण तिचं निधन नेमकं कशामुळे झालं? (Entertainment) याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या अनन्या राजच्या निधनाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अभिनेत्री अनन्या राज हिचं महिनाभरापूर्वीच झालं निधन (Ananya Raj Death at 35 family reveals she passed away)
सध्या अनन्या राजची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अनन्या राजची शेवटची पोस्ट 17 मे होती. तिने आपल्या पोस्टमध्ये काही फोटोस शेअर केले होते. या फोटोंमध्ये अभिनेत्री अनन्या राज प्रचंड सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने खास ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेस घातला होता. सोबतच तिने ब्लॅक ग्लव्ह्स घातले होते. अनन्या राजने या ड्रेसवर बोल्ड मेकअप केला होता. तिनं बोल्ड मेकअपसह रेड लिपस्टिक लावली होती. तसेच गोल्डन इअरिंग्स आणि गोल्डन चैन घातली होती. या लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड सुरेख दिसत होती.
View this post on Instagram
हे फोटो शेअर करुन अनन्या राजने लक्षवेधी कॅप्शनही दिलं होतं. तिनं पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'ब्लॅक टू व्हाईट' इट्स टाइम टू शाइन, असं लिहिलं होतं. नेटकरी तसेच तिच्या चाहत्यांनी अनन्या राजच्या सौंदर्याचं कौतुक केलं. सध्या तिची शेवटची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अभिनेत्री सोशल मीडियात प्रचंड सक्रीय होती. तिने 275k फॉलोअर्स होते. मिळालेल्या माहितीनुसार, अनन्या राज हिचा जन्म आणि वाढ मुंबईतच झाला आहे. तिने हिंदी तसेच इतर भाषांमधील सिनेमांमध्ये काम केलं.
2016 साली तिने '7 आवर्स टू गो' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. यानंतर ती 'द फाइनल एग्जिट'मध्ये दिसली होती. यानंतर ती विक्रम भट्ट यांचा सिनेमा 'घोस्ट' या चित्रपटात दिसली होती. अनन्या राज काही म्युझिक व्हिडीओतही दिसली होती. बॉलिवूडनंतर अभिनेत्री तेलुगु सिनेमात झळकली होती. अभिनेत्री 'मद्रासी गँग' आणि 'थगडे ले' या सिनेमातही झळकली होती. अनन्याच्या निधनाची बातमी अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करुन दिली. तिचा मृत्यू 15 जुलै रोजी झाला असल्याची माहिती त्यांनी पोस्टमधून दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग






















