एक्स्प्लोर

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ramesh Deo Demise : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नेते रमेश देव यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.

मुंबई : अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या  मनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत अभिनेता रमेश देव यांचे निधन झाले आहे . हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली.  रमेश देव यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी याबाबत माहिती दिली. रमेश देव यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव, मुलगा अभिनेता अजिंक्य देव, दिग्दर्शक अभिनय देव, सुना, नातवंडे असा परिवार आहे.  मुंबईतील कोकिळाबेन  रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी दुपारी अडीच वाजता पारसी  वाडा, विलेपार्ले पूर्व येथे रमेश देव यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

रमेश देव अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929  कोल्हापुर, महाराष्ट्रात झाला. 'आनंद' या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. 1956  साली रमेश देव यांनी 'आंधळा मागतो एक डोळा' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर 'आरती' हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता.  रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी 'पैशाचा पाऊस' आणि 'भाग्यलक्ष्मी' या चित्रपटांत काम केले. 

रमेश देवांचं खरं नाव ठाकूर ते मुळचे राजस्थानचे. त्यांचे वडिल कोल्हापूरमधील प्रख्यात फौजदारी वकील होते. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचे ठाकूर नाव बदलून देव केले होते. रमेश देव हे चित्रपटसृष्टीतील राजबिंडं व्यक्तिमत्व. त्यांच्या देखणेपणावर त्या काळी अनेक मुली फिदा होत्या. आलिया भोगाशी सिनेमाच्या वेळी रमेश देव आणि सीमा देव एकत्र आले आणि तेथेच त्यांच्यात प्रेमांकुर फुलले. त्या काळी हे दोघे ज्या सिनेमात असतील तो सिनेमा हिट होणारच असे म्हटले जात असे. राजबिंडं रुप असलं तरी रमेश देव यांनी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकाही केल्या. मराठीतील खलनायक रुबाबदार असू शकतो हे त्यांनी दाखवून दिले होते. आणि विशेष म्हणजे त्यांच्या या भूमिका प्रचंड गाजल्याही आणि प्रेक्षकांनी डोक्यावरही घेतल्या होत्या. आनंद चित्रपटातील त्यांची भूमिका राजेश खन्ना, अमिताभ सोबतच आजही आठवली जाते 1962 मध्ये अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांच्यासोबत लग्न केले. रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केले. या दोघांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Embed widget