Mac Mohan Birth Anniversary : क्रिकेटर बनायला आले अन् अभिनेता बनले! ‘शोले’च्या ‘सांबा’बद्दल ‘या’ गोष्टी महितीयेत का?
Mac Mohan Birth Anniversary : मॅक मोहन यांचे खरे नाव मोहन माकीजानी होते. मोहन यांचा जन्म 24 एप्रिल 1938मध्ये सध्याच्या पाकिस्तानतील कराचीमध्ये झाला.
Mac Mohan Birth Anniversary : बॉलिवूड विश्वात मैलाचा दगड ठरलेल्या ‘शोले’ या चित्रपटातील प्रत्येक पत्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या चित्रपटातील ‘जय-वीरू’ जोडीसह, ‘गब्बर’, ‘सांबा’ देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. या चित्रपटात ‘सांबा’ची भूमिका साकारली होती अभिनेता मॅक मोहन (Mac Mohan) यांनी.. मॅक मोहन यांचे खरे नाव मोहन माकीजानी होते. मोहन यांचा जन्म 24 एप्रिल 1938मध्ये सध्याच्या पाकिस्तानतील कराचीमध्ये झाला. आपण क्रिकेटर बनायचे हे स्वप्न घेऊन ते मुंबईत आले होते.
मॅक मोहन यांचे वडील ब्रिटीश सैन्यात कर्नल होते. या दरम्यान त्यांची बदली कराचीहून लखनऊला झाली आणि हे कुटुंब तिथेच स्थायिक झाले. मॅक मोहन यांचे शिक्षण देखील लखनऊमध्येच झाले. या दरम्यान त्यांची भेट सुनील दत्त यांच्याशी झाली आणी इथूनच त्यांना अभिनयाची गोडी लागली. कॉलेजमध्येच ते थिएटरमध्ये सामील झाले. याशिवाय त्यांनी पुण्यातील एफटीआयमध्ये देखील शिक्षण घेतले. तब्बल 46 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 200 हून अधिक हिंदी, मराठी, गुजराती, हरयाणवी, रशियन आणि स्पॅनिश चित्रपटांमध्ये काम केले.
बनायचे होते क्रिकेटर...
बालपणापासूनच मॅक मोहन यांना क्रिकेटची आवड होती. त्यांना क्रिकेटर बनायचे होते. क्रिकेटची ट्रेनिंग मुंबईतच चांगली मिळते, असे ऐकल्यामुळे ते मुंबईत आले. त्यांनी अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये भागही घेतला होता. मात्र, मुंबईत आल्यानंतर त्यांचे मन चित्रपटसृष्टीकडे वळले. मुंबईतील ‘फिल्मालय स्कूल’मध्ये त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. या दरम्यान त्यांना एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली.
यानंतर त्यांनी चेतन आनंद यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1964मध्ये त्यांनी ‘हकीकत’ या चित्रपटापासून अभिनेता म्हणून कारकीर्दीस सुरुवात केली. ‘शोले’ या चित्रपटाने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. ‘लक बाय चान्स’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. या दरम्यान त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला आणी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा :