Lara Dutta,Salman Khan,Partner : अजूनही सलमान मला मध्यरात्री फोन करतो; लारा दत्तानं सांगितलं गुपित
पार्टनर (Partner) या चित्रपटातील लारा (Lara Dutta) आणि सलमानच्या (Salman Khan) जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
Lara Dutta,Salman Khan,Partner : बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खान (Salman Khan) चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सलमान आणि अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. पार्टनर (Partner), नो एँट्री यांसारख्या चित्रपटांमध्ये सलमान आणि लारानं एकत्र काम केले आहे. पार्टनर या चित्रपटातील लारा आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. एका मुलाखतीमध्ये लारानं सलमान तिला मध्यरात्री फोन करते, असं सांगितलं.
मुलाखतीमध्ये लारानं सांगितलं की, सलमान रोज रात्री 12 वाजता उठतो. त्यानंतर तो मध्यरात्री मला फोन करतो. दररोज मला तो मध्यरात्री फोन करतो आणि मी देखील एवढ्या रात्री त्याचा फोन रिसिव्ह करते.'
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बेल बॉटम या चित्रपटातील लाराच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटामध्ये तिनं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तसेच लारानं हिकप्स अँड हूकप्सया सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. या सीरिजमध्ये प्रतीक बब्बर आणि शिनोवा यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली होती.
संबंधित बातम्या
- 'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनची चाहत्यांना आणखी एक भेट; यावर्षी 'हा' चित्रपट होणार रिलीज
- Actress Childhood Photo : 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या आहे बॉलिवूडची 'एंटरटेन्मेंट क्विन'
-
श्रीदेवीच्या पाठीवर लिहिलंय 'बोनी'; बोनी कपूरने शेअर केला जुना फोटो, चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha