Kumar Ramsay Death: हॉरर चित्रपटांचे बादशाह 'रामसे ब्रदर्स'मधील कुमार रामसे यांचं निधन
Kumar Ramsay Death: बॉलिवूडमधील हॉरर चित्रपटांचे बादशाह मानल्या जाणाऱ्या रामसे बंधुंपैकी ( Ramsay Brothers) कुमार रामसे (Kumar Ramsay) यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.

मुंबई : बॉलिवूडमधील हॉरर चित्रपटांचे बादशाह मानल्या जाणाऱ्या रामसे बंधुंपैकी ( Ramsay Brothers) कुमार रामसे (Kumar Ramsay) यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती आहे. त्यांच्या मागे पत्नी तसेच राज, गोपाल व सुनील अशी तीन मुलं आहेत.रामसे ब्रदर्सच्या बहुतेक चित्रपटांची स्क्रिप्ट लिहिण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
कुमार रामसे यांचा मोठे सुपुत्र गोपाल रामसे यांनी एबीपी न्यूजशी बोलताना म्हटलं की, आज पहाटे साडे पाचच्या सुमारास कुमार रामसे यांचे निधन झालं. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते 85 वर्षांचे होते त्यांना अन्य कुठलाही आजार नव्हता असं गोपाल यांनी सांगितलं.
कुमार रामसे हे चित्रपट निर्माते एफ यू रामसे यांचे सुपुत्र होते. आपल्या सात भावांमध्ये कुमार सर्वात मोठे होते. रामसे बंधूंमध्ये कुमार यांच्यासह केशु, तुलसी, करण, श्याम, गंगू आणि अर्जुन यांचा समावेश होता. 2019 मध्ये श्याम रामसे यांचे निधन झाले होते.
रामसे बदर्स त्यांच्या हॉरर सिनेमांसाठी खास ओळखले जातात. पुराना मंदिर, साया, खोज अशा कितीतरी हॉरर सिनेमांची निर्मिती या ब्रदर्सने केली. रोमॅन्टिक चित्रपटाचा काळ असताना रामसे बंधुंनी हॉरर सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. और कौन आणि दहशत या चित्रपटांची निर्मिती कुमार रामसे यांनी केली होती. कुमार रामसे यांनी 'रामसे ब्रदर्स' कडून 25 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. कुमार रामसे यांनी 1989 मध्ये रिलिज झालेल्या 'खोज' सिनेमाचं लेखन केलं होतं. ज्यात अभिनेता ऋषि कपूर आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत होते.
'रामसे ब्रदर्स' निर्मिती असलेले चित्रपट
1972 - दो गज जमीन के नीचे Do Ghaz Zameen Ke Niche
1975 - अंधेरा Andhera
1978 - दरवाजा Darwaza
1979 - और कौण Aur Kaun
1980 - सबूत Saboot
1980 - गेस्ट हाऊस Guest House
1981 - दहशत Dahshat
1981 - सन्नाटा Sannata
1981 - हॉटेल Hotel
1981 - घुंगरु की आवाज Ghungroo Ki Awaaz
1984 - पुराना मंदिर Purana Mandir
1985- टेलिफोन Telephone
1985 - 3D सामरी 3D Saamri
1986 - तहखाना Tahkhana
1986 -ओम Om
1987 - डाक बंगला Dak Bangla
1988 - वीराना Veerana
1989- पुरानी हवेली Purani Haveli
1990 - बंद दरवाजा Bandh Darwaza
1991 - इन्स्पेक्टर धनुश Inspector Dhanush
1991 - अजूबा कुदरत का Ajooba Kudrat Ka
1993 - झी हॉरर शो Zee Horror Show(TV serial)
1994 - द मॉन्स्टर The Monster
1996 - तलाशी Talashi
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
