Kubbra Sait : वन नाईट स्टँड ते गर्भपात, ‘ओपन बुक’मधून अभिनेत्री कुब्रा सैतने उलगडली आयुष्यातील अनेक गुपितं!
Kubbra Sait : अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) हिने नुकतेच 'ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर' हे पुस्तक लाँच केले आहे.

Kubbra Sait : लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गर्लफ्रेंडची अर्थात ‘कुक्कू’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) हिने नुकतेच 'ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर' हे पुस्तक लाँच केले आहे. या पुस्तकात अभिनेत्रीने असे अनेक खुलासे केले आहेत, हे वाचल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. लैंगिक शोषण असो किंवा बॉडी शेमिंग असो, कुब्राने आपल्या पुस्तकात सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. वयाच्या 17व्या वर्षी झालेले शारीरिक शोषण आणि रेस्टॉरंट मालकाने घेतलेला गैरफायदा, या सगळ्या गोष्टी तिने या पुस्तकात मांडल्या आहेत. कुब्राने आपल्या पुस्तकात अनेक मोठे खुलासे केले आहेत. यातील एक खुलासा सर्वात धक्कादायक आहे, तो म्हणजे अभिनेत्रीचा गर्भपात देखील झाला होता.
या पुस्तकातील एका भागात कुब्राने सांगितलेय की, वन नाईट स्टँडनंतर तिने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता. ती म्हणते की, हा तिचा स्वतःचा निर्णय होता आणि तिला त्याचा कोणताही पश्चाताप नाही. 2013मध्ये ती अंदमानला फिरायला गेली होती. त्यावेळी ही घटना घडली होती.
काय म्हणाली अभिनेत्री?
या पुस्तकात अभिनेत्रीने तिच्या 2013च्या अंदमान ट्रीपची ही कहाणी शेअर केली आहे. कुब्रा म्हणते, ‘मी त्यावेळी 30 वर्षांचे होते आणि स्कूबा डायव्हिंगनंतर स्वतःसाठी काही ड्रिंक्स घेण्यासाठी गेले होते. याच दरम्यान एका मित्रासोबत वन नाईट स्टँड घडला. आठवडाभरानंतर चाचणी केली असता, मी गरोदर असल्याचे मला कळले. मात्र, या बाळाला सांभाळण्याची माझी स्थिती नसल्याने, मी गर्भपाताचा निर्णय घेतला’. याबाबतचा खुलासा अभिनेत्री कुब्राने एका प्रसिद्ध वेबसाईटशी बोलताना केला आहे.
पश्चात्ताप नाही!
‘वयाच्या 23व्या वर्षी लग्न करून, 30व्या वर्षी मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांवरचा दबाव मला समजत नाही. हे एका अदृश्य नियम पुस्तकासारखे आहे. मी त्यासाठी तयार नाही हे मला माहीत आहे’, असे तिने म्हटले. आपल्या आयुष्यात घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा आपल्याला पश्चात्ताप होत नसल्याचेही अभिनेत्रीने म्हटले आहे.
कुब्रा सैतने अभिनेता सलमान खानच्या 'रेड्डी' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटामध्ये तिने छोटीशी भूमिका होती. यानंतर ती 'सुलतान', 'जवानी जानेमन', 'सिटी ऑफ लाईफ' यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे. मात्र, 'सेक्रेड गेम्स' ही वेब सीरिज तिच्यासाठी मैलाचा दगड ठरली.
हेही वाचा :
Bill Gates Resume : बिल गेट्स यांनी शेअर केला तब्बल 48 वर्ष जुना रेझ्युमे! पोस्ट लिहित म्हणाले....
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
