एक्स्प्लोर

Kota Factory Season 3 : 'पंचायत 3' ला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद, तितक्यातच 'सचिवजीं'च्या दुसऱ्या सीरिजचीही रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

Kota Factory Season 3 : जितेंद्र कुमारच्या दुसऱ्या सिरिजचा ट्रेलर रिलीज झाला असून कोटा फॅक्ट्री या सिरिजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या आला आहे. 

Kota Factory Season 3 : सध्या सगळीकडे 'पंचायत 3' च्या (Panchyat 3) सीझनची बरीच चर्चा सुरु आहे. पहिले दोन भाग गाजल्यानंतर नुकतच 28 मे रोजी या सिरिजचा तिसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. या सिरिजचा अवघ्या दोन दिवसांतच प्रेक्षकांनी अगदी भरभरुन प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळातंय. त्यातच आता या सिरिजमधील सचिवजीं अर्थातच अभिनेता जितेंद्र कुमारच्या (Jitendra Kumar) दुसऱ्या सिरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 'कोटा फॅक्ट्री' (Kota Factory) या बहुप्रतिक्षित सिरिजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

जितेंद्र कुमारची (Jitendra Kumar) 'कोटा फॅक्ट्री' (Kota Factory) ही प्रचंड लोकप्रिय वेबसीरिज आहे. या सीरिजचे दोन सीझन सुपरहिट झाले आहेत. या वेब सीरिजमध्ये कोटामध्ये आलेल्या आयआयटी-जेईई आणि एनईईटी या परिक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या सीरिजचा पहिला सीझन 2019 मध्ये युट्यूबवर आला. त्यानंतर या सीरिजला मिळत असलेली लोकप्रियता लक्षात घेत नेटफ्लिक्सने या सीरिजचा दुसरा सीझन रिलीज केला. नुकतच या सरिजच्या रिलीज डेटसाठीचा एक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

रिलीज डेटसाठी घातलं कोडं

या सिरिजच्या रिलीज डेटसाठी ट्रेलरमध्ये एक कोडं घालण्यात आलं आहे. यामध्ये जितेंद्र कुमार म्हणतो की, काय काय कमेंट्स येत आहे. कोटा फॅक्ट्रीचा तिसरा सीजन कधी येतोय, जितू भय्या कधी येतायत. कमेंट्स सेक्शनमध्ये तर पूर्ण अटेंडन्स दिसतेय. पण आता मी येतोय आणि कोटा फॅक्ट्रीचा नवीन सीझनही. चला डेट लिहून घ्या, जून... इतकं बोलून जितेंद्र थांबतो. पण पुढे तो म्हणतो की, इतक्या सहजासहजी रिलीज डेट सांगणार नाही, रिलीज डेटसाठी आम्ही एक गणित दिलंय, त्या गणितात कोटा फॅक्ट्री 3 ची रिलीज डेट आहे. त्यामुळे हे गणित सोडवा आणि रिलीज डेट जाणून घ्या. 

'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान हे गणित सोडवल्यास त्याचं उत्तर 20 असं येतं. त्यातच जितू भय्याने रिलीजचा महिना सांगितला आहेच. त्यामुळे कोटा फॅक्ट्रीचा तिसरा सीझन हा 20 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या सिरिजचा या दिवशी प्रमियर नेटफिक्सवर करण्यात येईल. आता पंचायतनंतर कोटा फॅक्ट्रीच्या तिसऱ्या सिजनची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

'कोटा फॅक्ट्री'ची स्टार कास्ट

'कोटा फॅक्ट्री' या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार आणि अहसास चन्नासह आलन खान, मयूर मोरे, रंजन राज सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच या सीझनमध्ये तिलोत्मा शोमदेखील झळकणार असल्याचं समोर आलं आहे. 'कोटा फॅक्ट्री'सह जितेंद्र 'पंचायत 3'मध्ये दिसणार आहे. 'पंचायत 3' 31 मे 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

ही बातमी वाचा : 

Marathi Serial Updates Zee Marathi :  'आयपीएल'च्या महासंग्रामातही झी मराठीची घौडदौड, प्रेक्षकांना खेचण्यात मिळालं यश!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget