Marathi Serial Updates Zee Marathi : 'आयपीएल'च्या महासंग्रामातही झी मराठीची घौडदौड, प्रेक्षकांना खेचण्यात मिळालं यश!
Marathi Serial Updates Zee Marathi : आयपीएलच्या महासंग्रामात छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांची रोडावत असताना दुसरीकडे झी मराठीने (Zee Marathi) जोमदार कामगिरी केली आहे.
Marathi Serial Updates Zee Marathi : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी सगळ्याच वाहिन्यांनी कंबर कसली आहे. आयपीएलच्या महासंग्रामात छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांची रोडावत असताना दुसरीकडे झी मराठीने (Zee Marathi) जोमदार कामगिरी केली आहे. झी मराठीवरील मालिकांनी आपला प्रेक्षक वर्ग कायम ठेवत त्यात वाढ केली असल्याचे दिसून आले आहे. झी मराठीने आयपीएलच्या धामधुमीच्या काही दिवस आधीच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणलेल्या. त्यांचा हा डाव कमालीचा यशस्वी झाल्याचे चित्र आहे.
क्रिकेट चाहते आयपीएलचे सामने आवडीने पाहतात. त्याशिवाय, सुट्टीवरही अनेकजण जात असतात. त्यामुळे आयपीएल सुरू असताना दुसरीकडे छोट्या पडद्यावरील मालिकांचा टीआरपी, टाइम स्पेंट व्ह्यूइंग (TSV) मध्ये कमालीची घट होत असते. मात्र, या काळातही झी मराठीने आपला प्रेक्षक वर्ग कायम ठेवला.
झी मराठीने 'पारू', 'शिवा', 'नवरी मिले हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' या नव्या मालिका आयपीएलचा महासंग्राम सुरू होण्याच्या काही दिवस आधीच प्रेक्षकांच्या भेटीस आणलेल्या. मात्र, झी मराठीचा हा डाव चांगलाच यशस्वी ठरला. 'जाऊ बाई गावत' सारख्या नाविन्यपूर्ण डिझाइन केलेल्या नॉन-फिक्शन शोमुळे मूळ स्लॉट प्रेक्षकांच्या मध्ये 41 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर, नवीन फिक्शन शोच्या लॉन्चसह टाइम स्पेंट व्ह्यूइंग (TSV) मध्ये 12 टक्क्यांची लक्षणीय वाढ दिसून आली.
आयपीएलच्या दरम्यान आम्ही स्ट्रॅटेजिकली शेड्युलिंग करून नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आमची प्रेक्षक संख्या वाढलीच नाही तर टीव्ही इंडस्ट्रीमध्येही उभे राहिलो असल्याचे झी मराठी आणि झी कन्नडचे चीफ कंटेट ऑफिसर राघवेंद्र हंसुर यांनी म्हटले. 'लाखात एक आमचा दादा' आणि 'ड्रामा ज्युनियर्स' या दोन मालिका आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणत असल्याची माहिती त्यांनी दिली.
झी मराठी नव्या लूकमध्ये...
View this post on Instagram
'पारू', 'शिवा', 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे ' या नवीन मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लक्षवेधक कथा, आकर्षक सेट, उत्तम निर्मितीमूल्य, उत्तम कलाकारांची फौज या सर्वांमुळे प्रेक्षकांना ह्या मालिका आपल्या वाटू लागल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. झी मराठीने आपला लोगो ग्राफिक बदलला असून आता चाफ्याचा ग्राफिक असणार आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करण्यासाठी आणि चाफ्याचा सुगंध पसरवण्यासाठी झी मराठी नव्या अवतारात 27 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला असल्याचे चॅनेलकडून सांगण्यात आले.