भारताला मोठा धक्का! 'लापता लेडीज' ऑस्कर 2025 मधून बाहेर; पण, UK नं पाठवलेला हिंदी चित्रपट 'संतोष' शॉर्टलिस्ट
Oscars 2025 Nominations: अॅकाडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सनं बुधवारी, 18 डिसेंबर रोजी ऑस्कर 2025 च्या शर्यतीतील चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली, ज्यांना 10 विविध कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं होतं.
Laapataa Ladies Out Form Oscars 2025: ऑस्कर 2025 (Oscar 2025) च्या शर्यतीत भारताला मोठा धक्का बसला आहे. किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित 'लाप्ता लेडीज' आणि पायल कपाडिया दिग्दर्शित 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' शर्यतीतून बाद झाला आहे. मात्र, यूकेनं पाठवलेल्या 'संतोष' (Santosh) या हिंदी चित्रपटानं 'बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म' श्रेणीत स्थान मिळवलं आहे.
अॅकाडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सनं बुधवारी, 18 डिसेंबर रोजी ऑस्कर 2025 च्या शर्यतीतील चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली, ज्यांना 10 विविध कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं होतं. आता या यादीनं भारताला मोठा धक्का दिला आहे. कारण किरण राव दिग्दर्शित 'लपता लेडीज' हा चित्रपट ऑस्कर 2025 मधून बाहेर पडला आहे. तसेच, यूकेकडून नॉमिनेशनमध्ये गेलेला 'संतोष' हा हिंदी भाषेतील चित्रपट 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म'साठी निवडला गेला आहे.
पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट' या चित्रपटाची भारतातून निवड झाली. मात्र, पुढच्या टप्प्यात पोहोचल्यावर हा चित्रपट शर्यतीतून बाहेर पडला. पण 'संतोष' या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपटाच्या श्रेणीत स्थान मिळालं आहे. 97 व्या अकादमी पुरस्कार 2025 साठी एकूण 85 चित्रपट नामांकन मिळालं होतं. पण त्यापैकी फक्त 15 निवडले गेले आणि संध्या सुरी दिग्दर्शित चित्रपटानं त्यात आपले स्थान निर्माण केलं.
Laapata Ladies is not short listed for the best international feature by @TheAcademy but Sandhya Suri’s UK-backed Santosh has made the list. pic.twitter.com/sjEMyYzBhP
— Kalyani Mangale (@MangaleKalyani) December 17, 2024
ऑस्करमध्ये नामांकन मिलालेल्या 'संतोष'ची कहाणी काय?
'संतोष' फिल्मचा प्रिमीयर मे, 2024 मध्ये 77 व्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात आला होता. समीक्षकांनीही या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. या चित्रपटाची कथा एका महिलेची कथा आहे, जिला तिच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या जागी पोलिसांची नोकरी मिळते. या महिलेचं नाव संतोष, जी अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येचा तपास करते. यानंतर तिचा सामना गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या विश्वाशी होतो.
Congrats to Sandhya Suri and the entire #Santosh team on making the shortlist for the 97th Academy Awards' Best Int'l Feature category! SANTOSH opens NYC's @IFCCenter Dec 27th!
— Metrograph Pictures (@metrograph_pics) December 17, 2024
Full list of shortlisted films - https://t.co/rUlDXeRCKo pic.twitter.com/JLPgg8HA23
'संतोष' ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट
या सिनेमात सुनीता राजवार एका इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहेत, जी एका दलित मुलीच्या हत्येचं गूढ उकलते. तर शहाना मुख्य भूमिकेत आहे. टीमनं इंस्टाग्रामवरही आनंद व्यक्त केला असून सर्वांचे आभार मानले आहेत. चित्रपट शॉर्टलिस्ट झाल्याबद्दल प्रोडक्शन हाऊसनंही आनंद व्यक्त केला आहे. पण खेदाची गोष्ट म्हणजे, नामांकन मिळालेल्या 15 चित्रपटांच्या यादीत भारताचं नाव कुठेच नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :