(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tejaswini Pandit New Movie : तेजस्विनी पंडितचा 'येक नंबर' परिवार, महिला दिनानिमित्तान केली नव्या भूमिकेची घोषणा
Tejaswini Pandit New Movie : अभिनेत्री तेजस्विनी पंडित हीने महिला दिनानिमित्ताने तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
Tejaswini Pandit New Movie : जागतिक महिला दिनानिमित्ताने (International Women's Day) अनेक नव्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातच अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हीने देखील तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीये. तेजस्विनी पंडित या चित्रपटातून एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तेजस्विनी निर्मातीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तेजस्विनी या चित्रपटाची निर्मिती म्हणून काम करणार आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या संदर्भात घोषणा केलीये.
तेजस्विनीचा येक नंबर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राजेश मापुस्कर यांनी सांभाळली आहे. तसेच अजय - अतुल यांनी संगीताची आणि छायाचित्रकाराची जबाबदारी संजय मेमाने यांनी सांभाळली आहे. तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील सुरुवात झाली असल्याची माहिती तेजस्विनीने दिलीये.
तेजस्विनीची पोस्ट नेमकी काय?
तेजस्विनीने ट्विटरच्या माध्यमातून तिच्या या चित्रपटाची घोषणा केलीये. तिने म्हटलं की, मित्र-मैत्रिणींनो आज जागतिक महिला दिनानिमित्त मी आणि माझी सशक्त मैत्रीण, सहकारी निर्माती वर्धा नाडियाडवालाच्या साथीने आजपासून “येक नंबर” कारभार जमवलाय, निर्माती म्हणून आणखी एक मोठी उडी घेतलीये, नेहमीप्रमाणे तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असू दे ! ह्या आमच्या प्रवासात आम्हाला भक्कम तंत्रज्ञ लाभले आहेत. दिग्दर्शक राजेश मापुस्कर, छायाचित्रकार संजय मेमाने आणि संगीत अजय-अतुल. आमच्या ह्या “येक नंबर” परिवाराला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे !
मित्र-मैत्रिणींनो
— TEJASWWINI (@tejaswwini) March 8, 2024
आज जागतिक महिला दिनानिमित्त मी आणि माझी सशक्त मैत्रीण, सहकारी निर्माती वर्धा नाडियाडवालाच्या साथीने आजपासून
“येक नंबर” कारभार जमवलाय,
निर्माती म्हणून आणखी एक मोठी उडी घेतलीये, नेहमीप्रमाणे तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असू दे !
ह्या आमच्या प्रवासात आम्हाला भक्कम… pic.twitter.com/oKcOwwtkZT
चित्रपटात कोणती स्टारकास्ट झळकणार?
तेजस्विनीने केलेल्या या पोस्टमध्ये कोणती स्टारकास्ट असणार याबाबत अद्याप कोणतंही भाष्य तिनं केलं नाहीये. त्यामुळे आता तेजस्विनीच्या आगामी या चित्रपटात कोणती नवी स्टारकास्ट झळकणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तसेच तिच्या या चित्रपटात प्रेक्षकांना नवीन चेहरे पाहायला मिळणार का असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत. याची उत्तरं आगामी काळात प्रेक्षकांना मिळतीलच. तेजस्विनीसोबत वर्धा नाडियाडवाला ही देखील या चित्रपटाच्या निर्मिती धुरा सांभाळणार आहे.