कियारा अडवाणीला माहीत नाहीत दक्षिण भारतातील राज्यांची नावं, शोमध्ये विचारलेल्या प्रश्नावर त त प प, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kiara Adwani Got Trolled : अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका शोमध्ये विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देता न आल्याने ती ट्रोल होताना पाहायला मिळत आहे.
Kiara Adwani Viral Interview Ram Charan & Rana Daggubati : अभिनेत्री कियारा अडवाणीचा मोठा चाहतावर्ग आहे. कियाराने बॉलिवूडसह दक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच कियारा अडवाणी साऊथ सुपरस्टार राम चरण आणि राणा दग्गुबत्ती यांच्या 'नंबर 1 यारी' शोमध्ये झळकली. या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी कियाराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका शोमध्ये विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देता न आल्याने ती ट्रोल होताना पाहायला मिळत आहे.
कियाराला माहीत नाहीत दक्षिण भारतातील राज्यांची नावं
'नंबर 1 यारी' शो गेल्या वर्षी रिलीज झाला होता. 'नंबर 1 यारी' शोमधील सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये राम चरण आणि कियारा आले होते. 2023 मध्ये प्रसारित झालेल्या या एपिसोडमध्ये अनेक खास क्षण होते. ही मुलाखत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच एका रेडिट (Reddit) युजरने एपिसोडमधील एक क्लिप शेअर केली ज्यामध्ये तिला दक्षिण भारतातील राज्यांची नावे सांगता आली नाही. राणा आणि राम यांनी कियाराला दक्षिण भारताबद्दल काही प्रश्न विचारले आणि तिला दक्षिण भारतीय राज्यांची नावे विचारली, पण कियाराच्या उत्तरामुळे ती सर्वांच्याच निशाण्यावर आली आहे.
शोमध्ये विचारलेल्या प्रश्नावर त त प प
दक्षिण भारतातील राज्यांची नावे सांगताना कियाराने तुटक-तुटक शब्दात उत्तर दिलं आणि तेही अपूर्ण. कियारा अडवाणीने तेलंगणा राज्याचं नाव घेत उत्तर द्यायला सुरुवात केली, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचं नाव घेतलं. त्यानंतर तामिळनाडूचं नाव घेतलं, पण त्यासाठी राणा दग्गुबत्तीला तिला मदत करावी लागली. तामिळनाडूचं नाव घेतल्यानंतर ती केरळचा उल्लेख करायला विसरली. राणा पुन्हा तिला मदत करत विचारलं की, मल्याळम कुठून आहे? कियाराला याचं उत्तर माहित नव्हतं. शेवटी राम चरणने या प्रश्नाचं 'केरळ' असं उत्तर दिलं. यावर कियारा म्हणाली, होय, मी तेच म्हणणार होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :