KGF2 Co Director Kirtan Nadagouda 4 Year Old Son Passes Away: KGF च्या सहदिग्दर्शकाच्या साडेचार वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून करुण अंत; खेळता खेळता लिफ्टमध्ये शिरला अन्..
KGF2 Co Director Kirtan Nadagouda 4 Year Old Son Passes Away: आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेता पवन कल्याण यांनी या दुःखद बातमीवर शोक व्यक्त केला आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

KGF2 Co Director Kirtan Nadagouda 4 Year Old Son Passes Away: साऊथच्या (South Film) ब्लॉकबस्टर 'KGF' आणि 'सलार'चे को-डायरेक्टर कीर्तन नादगौडा (Salaar Co-director Kirtan Nadgouda) यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 17 डिसेंबर रोजी लिफ्टमध्ये अडकून कीर्तन नादगौडा (Kirtan Nadgouda) यांच्या अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. अवघा साडेचार वर्षांचा सोनार्श नादगौडा लिफ्टमध्ये अडकलेला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेता पवन कल्याण यांनी या दुःखद बातमीवर शोक व्यक्त केला आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
कन्नड प्रभानं दिलेल्या वृत्तानुसार, नाडागौडा कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी ही एक असह्य शोकांतिका असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सोनारशचं वर्णन एक प्रेमळ आणि उत्साही मुलगा असं केलं आहे. त्याच्या अचानक जाण्यानं अख्खं नादगौडा कुटुंब शोकसागरात बुडालं आहे.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी लिहिलं की, "दिग्दर्शिक कीर्तना नादगौडा यांच्या मुलाचं निधन झालं असून घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. तेलुगू आणि कन्नड दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या कीर्तना नाडागौडा यांच्या कुटुंबावर आलेल्या दुःखद घटनेनं मी खूप दुःखी आहे. कीर्तना आणि श्रीमती समृद्धी पटेल यांचे पुत्र सोनारश के. नादगौडा यांचं निधन झालं आहे..."
नेमकं काय घडलं?
मीडिया रिपोर्टनुसार, ही काळीज पिळवटणारी घटना हैदराबादमध्ये घडली. सोमवारी, 15 डिसेंबर रोजी चिमुकला सोनार्श खेळता खेळता एकटाच लिफ्टमध्ये गेला. यावेळी लिफ्टमध्ये अडकल्यामुळं त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. सोनार्शला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण, दुर्दैवानं खूप उशीर झालेला आणि सोनार्शनं या जगाचा निरोप घेतलेला. हा अपघात इतका भीषण होता की, काही क्षणांतच सोनार्शनं आपले प्राण गमावलेले.
कीर्तन नादगौडा कोण?
कीर्तन नादगौडा एक इंडियन फिल्ममेकर आणि असिस्टंट डायरेक्टर आहे. त्यांनी साऊथ सिनेमांमध्ये काम केलं आहे, विशेषतः प्रशांत नीलसोबत. त्यांनी केजीएफच्या दोन्ही भागांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी यावर्षी प्रशांत नीलच्या हॉरर चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करण्याची घोषणा केलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























