Sun Marathi Serial Me Sansar Maza Rekhite Controversy: 'बंद करा ही मालिका.... किती Negativity'; नवऱ्याचा जाच पाहून प्रेक्षकांचा संताप; थेट दिग्दर्शक, निर्मात्यांवर आगपाखड
Sun Marathi Serial Me Sansar Maza Rekhite Controversy: 'सन मराठी' वाहिनीवरच्या 'मी संसार माझा रेखिते' या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. याच प्रोमोवरुन नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर जोरदार संताप व्यक्त केला आहे.

Sun Marathi Serial Me Sansar Maza Rekhite Controversy: गेल्या काही महिन्यांत मराठी मनोरंजन विश्वात (Entertainment News) अनेक नवनव्या मालिका आल्यात. जवळपास सगळ्याच मालिकांमध्ये दिग्गज कलाकार झळकले आहेत. नव्यानं सुरू झालेल्या मालिका (Marathi Serials) प्रेक्षकांना खूप आवडत असल्याचंही पाहायला मिळंतय. त्या मालिकांचं कथानक, मालिकांमधील कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. पण, या मालिकांपैकी काही मालिका अशा आहेत, ज्या पाहून प्रेक्षकांना अगदी वीट आलाय. बरं फक्त वीट नाही आलाय, तर प्रेक्षकांनी अशा मालिका बंद करा, अशी मागणीच करायला सुरुवात केलीय.
मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतातच, पण त्यामध्ये दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचा, त्या मालिकेच्या कथानकाचा प्रेक्षकांवरही परिणाम होत असतो. 'सन मराठी' (Sun Marathi) वाहिनीवरच्या 'मी संसार माझा रेखिते' (Mee Sansar Majha Rekhite) या मालिकेत नुकत्याच दाखवण्यात आलेल्या एका दृश्यानं सर्वांना हादरवून सोडलं आहे. तो सीन पाहून प्रेक्षकांना अक्षरशः मनस्थाप झाला आहे. या मालिकेत अभिनेता हरिष दुधाडे (Harish Dudhade) आणि अभिनेत्री दिप्ती केतकर (Actress Deepti Ketkar) मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या एका प्रोमो पाहून प्रेक्षकांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. या प्रोमोवरुन नेटकऱ्यांनी मालिकेच्या दिग्दर्शक, निर्मात्यांसोबतच मालिका ज्या वाहिनीवर प्रसारित होते, त्या वाहिनीलाही सुनावलंय.
View this post on Instagram
मालिकेच्या प्रोमोमध्ये नेमकं दाखवलंय काय? (Mee Sansar Majha Rekhite Serial Promo)
'सन मराठी' वाहिनीवरच्या 'मी संसार माझा रेखिते' या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. याच प्रोमोवरुन नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर जोरदार संताप व्यक्त केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की, मालिकेतील नायिकेच्या घरी काही पाहुणे जेवायला येतात, त्यावेळी ती पाहुणा म्हणून आलेल्या एका पुरुषाचं कौतुक करते, नेमकं हेच तिच्या नवऱ्याला खटकतं आणि त्याचा राग अनावर होतो. ती घरी एकटी असताना नवरा सगळा राग तिच्यावर काढतो. गरम दुधाचा टोप घेऊन येतो आणि तिचे केस धरुन जबरदस्तीनं तो संपूर्ण टोप तिच्या तोडाला लावून तिला ते प्यायला भाग पाडतो. तिच्यावर हिंसाचार करतो... नायिका गयावया करत असते, पण तो तिचं काहीच ऐकत नाही, रागानं बेफाम झालेला असतो.
प्रोमो पाहून नेटकरी संतापले (Sun Marathi Serial Promo Controversy)
'मी संसार माझा रेखिते' मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी वैतागले. त्यांनी प्रोमोवर कमेंट करुन राग व्यक्त करायला सुरुवात केली. आपण कुठल्या जमान्यात राहतो, स्त्रियांना सशक्त दाखवायचं सोडून हे असं दुर्बल का दाखवताय? असा सवाल अनेकांनी केलाय. तसेच, अनेकांनी म्हटलंय की, आत्ताच्या काळात कोणतीच स्त्री इतकी सोशिक नसते, असंही अनेकांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींचा चांगला-वाईट परिणाम समाजावर होत असतो, त्यामुळे मालिकांमध्ये असं काही दाखवलं तर त्याचा समाजात वाईट परिणाम होऊ शकतो, असं अनेकांचं म्हणणं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























