Kesari 2 Box Office Collection Day 6: अक्षय कुमार पुन्हा एकदा फ्लॉप! 6 दिवसांत बजेटच्या निम्मीही कमाई करू शकला नाही 'केसरी 2'
Kesari 2 Box Office Collection Day 6: सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाशी टक्कर झाल्यानंतर, 'केसरी 2' नं दररोज कोटींची कमाई केली. पण आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गटांगळ्या खाऊ लागला आहे.

Kesari 2 Box Office Collection Day 6: अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'केसरी 2' (Kesari 2) या चित्रपटाची क्रेझ बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) कमी होताना दिसत आहे. 18 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झाले आहेत आणि तो त्याच्या बजेटचा अर्धा भागही वसूल करू शकलेला नाही. अशा परिस्थितीत अक्षय कुमारच्या खात्यात आणखी एक फ्लॉप चित्रपट जमा होणार आहे, असंच दिसतंय.
'केसरी 2' बॉक्स ऑफिसवर दररोज सरासरी कलेक्शन करत होता. सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाशी टक्कर झाल्यानंतर, चित्रपटानं दररोज कोट्यवधींची कमाई केली. पण आता 'केसरी 2' गटांगळ्या खाऊ लागला आहे. 7.75 कोटींनी सुरुवात करणाऱ्या या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये बुधवारी (सहाव्या दिवशी) मोठी घट दिसून आली.
| दिवस | कलेक्शन |
|---|---|
| दिवस 1 | 7.75 कोटी |
| दिवस 2 | 9.75 कोटी |
| दिवस 3 | 12 कोटी |
| दिवस 4 | 4.5 कोटी |
| दिवस 5 | 5 कोटी |
| दिवस 6 | 3.20 कोटी |
| एकूण | 42.20 कोटी |
केसरी 2' सहाव्या दिवसाचं कलेक्शन किती?
'केसरी 2' च्या सहाव्या दिवसाच्या कलेक्शनचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. सॅक्निल्कमधील एका वृत्तानुसार, अक्षय कुमारच्या चित्रपटानं आतापर्यंत (संध्याकाळी 7 वाजता) बॉक्स ऑफिसवर 3.20 कोटी रुपये कमावले आहेत. आता चित्रपटाचं एकूण कलेक्शन 42.20 कोटी रुपये झालं आहे. जरी हे 'केसरी 2' च्या बजेटच्या एक तृतीयांशही नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचं बजेट 150 कोटी रुपये आहे.
View this post on Instagram
'केसरी 2' फ्लॉप ठरेल
'केसरी 2' च्या दैनंदिन कलेक्शनवर नजर टाकल्यास, चित्रपटाला त्याची किंमत वसूल करता येणार नाही असा अंदाज आहे. हे असंही म्हटलं जातंय, कारण आता 25 एप्रिल रोजी इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' देखील पडद्यावर येणार आहे.
| फिल्म | बजेट | कलेक्शन |
| स्काई फोर्स | 160 कोटी | 131.44 कोटी |
| खेल खेल में | 100 कोटी | 39.29 कोटी |
| सरफिरा | 100 कोटी | 24.85 कोटी |
| बड़े मियां छोटे मियां | 350 कोटी | 65.96 कोटी |
| सेल्फी | 100 कोटी | 17.03 कोटी |
अजय देवगणचा 'रेड 2' आणि संजय दत्तचा 'द भूतनी' हे चित्रपटही 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहेत. अशा परिस्थितीत 'केसरी 2' बॉक्स ऑफिसवरुन गाशा गुंडाळणार, हे निश्चित आहे. याआधीही अक्षय कुमारचे अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
























