कौन बनेगा करोडपतीमध्ये उद्धटपणा केल्यानं troll झाला, इशितच्या बाजूने बोलण्यासाठी पुढे आली गायिका, ट्रोलर्सची खरडपट्टी काढली
इशितला त्याच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे शोमधून रिकाम्या हाताने घरी जावं लागलं . काही वेळातच हे प्रकरण वाढलं आणि लोकांनी इशित भट्टला ट्रोल करायला सुरुवात केली .

KBC junior overconfident contestant boy: सध्या कौन बनेगा करोडपती सीजन 17 मध्ये पाचवीत शिकणाऱ्या इशित भट्ट सध्या चर्चेत आहे . कौन बनेगा करोडपती या शोमधील इशित भट्टची (Ishit Bhatt) एक क्लिप व्हायरल झाली होती .यामध्ये तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत काहीसे विचित्रपणे वागताना दिसत होता . या शोमधील त्याचा उर्मटपणा दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला . इशितचे वर्तन लोकांना आवडलं नाही त्यामुळे जवळपास अख्ख सोशल मीडिया त्याच्यावर आणि त्याच्या पालकांवर तुटून पडलं . इशितला त्याच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे शोमधून रिकाम्या हाताने घरी जावं लागलं . काही वेळातच हे प्रकरण वाढलं आणि लोकांनी इशित भट्टला ट्रोल करायला सुरुवात केली .
सोशल मीडियावर इशीत वर केलेल्या या तीव्र टीकेनंतर गायिका चिन्मय श्रीपदा पुढे सरसावल्या आहेत . 'लोक एका लहान मुलाला अशा प्रकारे ट्रोल करत आहेत हे आपल्या समाजाबद्दल खूप काही सांगतं ' असं म्हणत त्यांनी ट्रॉलर्सची चांगलीच खरडपट्टी काढली आहे . ट्रॉलर्सची झुंड या उत्साहित मुलाला लक्ष्य करत असल्याचंही त्या म्हणाले आहेत .
एका उत्साही मुलाला लक्ष्य करताहेत...
कौन बनेगा करोडपती मध्ये सध्या troll होत असलेला इशित भट्टच्या बाजूने बोलण्यासाठी आता गायिका चिन्मयी श्रीपाद पुढे आली आहे. त्यांनी पोस्ट करत इशितला troll करणाऱ्या सगळ्यांना खडसावलं आहे.
“एक प्रौढ ट्वीट करत आहे की हा सर्वाधिक नापसंत मुलगा आहे.
इथे ट्विटरवरले प्रौढ लोक हे सर्वात आळशी, तोंडाळ आणि अपमानजनक आहेत; जेव्हा मुलं खोकल्याच्या औषधामुळे मृत्यू पावली तेव्हा यापैकी कुणीही काहीही बोललं नाही.
पण हो, एका मुलावर हल्ला करा. हे आपल्या संपूर्ण समाजाबद्दल खूप काही सांगतं.
हा संपूर्ण जमाव फक्त एका उत्साही, लहान मुलाला ट्रोल करत आहे – या लोकांनी स्वतःला किती भयानक गुंडांच्या जमावात रूपांतरित केलं आहे!”
An adult putting a tweet saying most hated *kid*.
— Chinmayi Sripaada (@Chinmayi) October 12, 2025
Adults here on Twitter have been one of the most lousy, foul mouthed, abusive lot; none of these voices said a thing when kids died due to a cough syrup.
But yeah pick on a kid. Says a LOT about the ecosystem.
This entire lot… https://t.co/F5pORD1ENv
इशित नेमका कशामुळे ट्रोल झाला ?
गुजरातमधील गांधीनगर येथे पाचवीत शिकणारा विद्यार्थी इशित भट्ट अलीकडेच केबीसी मध्ये स्पर्धक म्हणून दिसला .संपूर्ण एपिसोड मध्ये अनेक प्रेक्षकांनी त्याला लहान मुलाचे वर्तन असंभ्य आणि अनादरपूर्ण असल्याचं सांगितलं . यशो मध्ये अमिताभ बच्चन बोलत असताना हा लहान मुलगा अत्यंत उद्धटपणे वागतो .त्यांना सतत मध्ये मध्ये थांबवतो .हसत हसत विचित्र गोष्टी बोलतो .एवढेच नाही बिग बी अंकल आप भी तो गलती करते हो ना ! असं म्हणतो . अमिताभ बच्चन संपूर्ण शो मध्ये अत्यंत संयमान आणि शांतपणे वागताना दिसतात .ते हसत खेळत त्या मुलाशी बोलतात .शोमधील वातावरण अत्यंत हलकफुलकं ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण या लहान मुलाचं वर्तन अनेक नेटकरांना आवडलेलं नाही . ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर या मुलाला अनेकांनी ट्रोल केलं .पण आता इशीतच्या बाजूने एक गायिका उतरली आहे .चिन्मयी श्रीपदा या गायिकेने इशीतच्या बाजूने एक पोस्ट केलीय .


















