एक्स्प्लोर

Kaylee Hottle Death: सिनेसृष्टी गाजवणाऱ्या तरुण अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 18 व्या वर्षी रस्ते अपघातात मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा

Kaylee Hottle Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी निधन झालंय. रस्ते अपघातात अभिनेत्रीनं जागीच जीव गमावल्याची माहिती मिळतेय.

Kaylee Hottle Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं (Famous Actress) वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी निधन झालं आहे. एक गंभीर रस्ते अपघातात (Road Accident) अभिनेत्रीनं अखेरचा श्वास घेतल्याचं सांगितलं जात आहे. 'गॉडजिला वर्सेस कॉन्ग' (Godzilla vs. Kong) आणि 'गॉडजिला एक्स कॉन्ग: द न्यू एम्पायर'मध्ये (Godzilla x Kong: The New Empire) जियाची लक्षात राहणारी भूमिका साकरणारी अमेरिकन अभिनेत्री केली हॉटल (Kaylee Hottle) हिनं वयाच्या अवघ्या 18 वर्षांतच जगाला अलविदा म्हटलं. 

अमेरिकनं मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेरीलँडमध्ये एका रस्ते अपघातात केली हॉटल गंभीर जखमी झाली आणि रुग्णालयात नेत असतानाच तिनं अखेरचा श्वास घेतला. तिचे वडील, जोशुआ हॉटल यांनी या दुःखद बातमीला दुजोरा दिला. केली तिच्या प्रभावी अभिनयासाठी आणि हॉलिवूडमध्ये कर्णबधिर कलाकारांच्या प्रतिनिधित्वाचा खंबीरपणे पुरस्कार करणारी कलाकार म्हणून ओळखली जात असे. तिच्या अकाली निधनामुळे सिनेसृष्टी आणि कर्णबधिर समुदायात शोककळा पसरली आहे.

केली हॉटलचा जन्म 2007 मध्ये जॉर्जियामध्ये झालेला आणि त्यानंतर तिचं कुटुंब टेक्सासमध्ये आलं आणि तिथेच तिचं लहानपण गेलं. केली अशा कुटुंबातून आलेली, जिथल्या अनेक पिढ्यांमध्ये कर्णबधीर होत्या. अमेरिकन साइन लँग्वेज (ASL) वर असलेल्या तिच्या मजबूत पकडीमुळे तिला लहान वयातच जाहिरातींमध्ये काम मिळालं. 2021 मध्ये तिनं 'Godzilla vs. Kong'मधून मोठ्या पडद्यावर डेब्यू केला.  या सिनेमात तिनं 'जिया' नावाच्या एका मूक-बधिर मुलीची भूमिका साकारली होती, जिचं किंग कॉन्गसोबत भावनिक नातं होतं. तिच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोघांनीही खूप कौतुक केलेलं.

त्यानंतर केलीनं 2024 मध्ये रिलीज झालेल्या 'गॉडजिला वर्सेस कॉन्ग': द न्यू एम्पायर'मध्येही जियाची भूमिका पुन्हा साकारली. याव्यतिरिक्त तिनं टीव्ही सीरिज 'Magnum P.I.'मध्येही काम केलेलं. कित्येक मुलाखतींमध्ये तिनं म्हटलेलं की, फिल्म्स आणि टीव्हीमध्ये वास्तववादी भूमिका साकारण्याची संधी कर्णबधिर कलाकारांना अधिक प्रमाणात मिळायला हवी. तिच्या निधनामुळे हॉलिवूडनं अत्यंत तरुण वयातील एक उदयोन्मुख प्रतिभावान अभिनेत्री गमावली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amitabh Bachchan Shares Health Update: अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; स्वतः बिग बींनी दिली हेल्थ अपडेट, म्हणाले, 'रिकव्हरीचा काळ खूप कठीण...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget