Karishma Tanna Wedding: करिश्मा तन्नाच्या घरी सुरु लगीनघाई, 5 फेब्रुवारीला होणार 'शुभमंगल सावधान'
टेलिव्हिजन अभिनेत्री करिश्मा तन्ना लवकरच तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. करिश्माच्या लग्नाचे विधी आजपासून सुरु होत असून गोव्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे दोघेही सात फेरे घेणार आहेत.
Karishma Tanna Wedding : आजकाल टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत लग्नसराई सुरु झाली आहे. अलीकडेच कतरिना कैफ(Katrina kaif)-विकी कौशल (Vicky Kaushal) विवाह बंधनात अडकले. त्यानंतर, अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)-विकी जैन (Vicky Jain) आणि मौनी रॉय (Mouni Roy)-सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा विवाह पार पडला. आता आणखी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीचा यामध्ये समावेश होणार आहे. अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna )तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेराबरोबर (Varun Bangera) लग्न करणार आहे.
टेलिव्हिजन अभिनेत्री करिश्मा तन्नासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज करिश्माने तिच्या मंगेतर वरुण बंगेराबरोबर सहजीवनाचा प्रवास करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
रिपोर्ट्सनुसार, करिश्माचा आज हळदीचा सोहळा होणार आहे. तिच्या इंन्स्टाग्रामच्या स्टोरी सेक्शनमध्ये तिने फुलांच्या सजावटीची झलक दाखवली आहे. त्याचबरोबर असंही सांगण्यात आलं आहे की, कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन या जोडप्याने जवळचे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये हळदीचा विधी ठेवला आहे. उद्या म्हणजेच 4 फेब्रुवारीला मेहंदी सोहळा पार पडणार आहे. तर, 5 फेब्रुवारीला लग्नाचा शुभ मुहूर्त ठरविण्यात आला आहे. मौनी रॉय आणि सूरज नांबियार प्रमाणेच करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरानेही डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन केला आहे. हे दोघे गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सात फेरे घेणार आहेत. या विवाह सोहळ्याला टेलिव्हिजन अभिनेत्री अनिता हसनंदानी, रिद्धिमा पंडित आणि एकता कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावण्याची शक्यता आहे.
करिश्मा तन्ना ही तिच्या नागिन-3 (Naagin-3) मधीन मुख्य भूमिकेसाठी विशेष ओळखली जाते. तसेच तिने बिग बॉस सिझन 8 (Big Boss-8) आणि खतरों के खिलाडी 10 (Khatron ke khiladi 10) यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. खतरों के खिलाडीमध्ये तिने ट्रॉफीचा मान पटकावला होता.
महत्वाच्या बातम्या :
- katrina Vicky Wedding : कतरिना-विकीचा लग्नानंतरचा पहिला फोटो आला समोर
- Ankita Lokhande-Vicky Jain Wedding : राजेशाही थाटात पार पडला अभिनेत्री अंकिता लोखंडेचा लग्नसोहळा
- Mouni Roy Wedding : मौनी रॉयने लग्नसोहळ्यातील फोटोसोबत सप्तपदी मंत्र केला पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha