Jehs First Birthday Photos : 'जेह'चा पाहिला वाढदिवस; करिनाच्या छोट्या जहांगिरला खास शुभेच्छा!
'जेह' (Jehangir Ali Khan Pataudi) चा आज पहिला वाढदिवस आहे.
Jehs First Birthday Photos : अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor Khan) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी शेअर करते. आज करिना आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मुलगा 'जेह' (Jehangir Ali Khan Pataudi) चा पहिला वाढदिवस आहे. यानिमित्तानं करिनानं तैमुर (Taimur Ali Khan Pataudi) आणि जेहचा खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला करिनानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
जेह (जहांगिर अली खान) आणि तैमुरचा फोटो शेअर करून करिनानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या भावा मी आता एक वर्षाचा झालो. चल एकत्र जग पाहूयात. वाढदिवसाच्या शुभेच्छा जेह. तु माझं आयुष्य आहेस.' या फोटोमध्ये जेह आणि तैमुर हे रांगताना दिसत आहेत.
करिना आणि सैफनं 2012 साली लग्नगाठ बांधली. 2016 साली तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2021 रोजी जहांगिरचा जन्म झाला. 'जेह' हे जहांगिरचे टोपण नाव आहे. 'जेह'चे आणि तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अमृता आरोरा, सबा पतौडी आणि करिश्मा कपूर यांनी 'जेह' चा फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
करिना कपूरचा लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. करिनासोबत अभिनेता आमिर खान हा या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
संबंधित बातम्या
- Dadasaheb Falke International Film Festival Awards : 'शेरशाह' बेस्ट फिल्म तर रणवीर बेस्ट अॅक्टर; पाहा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांची यादी
- Sai Pallavi : 'कोट्यवधींचं मानधन असणारी जाहिरात नाकारली' ; चेहऱ्यावरील पिंपल्सबाबत साई पल्लवीनं सांगितला अनुभव
- Hrithik Roshan ह्रतिकच्या फॅमिली फोटोमधील नव्या पाहुण्याची चर्चा ; व्हायरल फोटोमुळे रंगल्या चर्चा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha