कॉमेडी किंग Kapil Sharmaच्या घरी गूड न्यूज, गिन्नी-कपिल पुन्हा आई-बाबा बनणार!
कपिल शर्माने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर दुसरा छोटा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे.
![कॉमेडी किंग Kapil Sharmaच्या घरी गूड न्यूज, गिन्नी-कपिल पुन्हा आई-बाबा बनणार! Kapil Sharma to be blessed with a baby again, wife Ginni Chatrath to become mother for second time कॉमेडी किंग Kapil Sharmaच्या घरी गूड न्यूज, गिन्नी-कपिल पुन्हा आई-बाबा बनणार!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/29013724/WhatsApp-Image-2021-01-28-at-8.06.57-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सगळ्यांना आपल्या विनोदांनी मनसोक्त हसवणारा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी लवकरच आनंदाची वार्ता येणार आहे. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांच्या आयुष्यात लवकरच नवा पाहुणा येणार आहे. गिन्नी चतरथ प्रेग्नंट असून गिन्नी-कपिल पुन्हा एकदा आई-बाबा बनणार आहे.
स्वत: कपील शर्माने या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे. ट्विटरवर #AskKapil सेशन दरम्यान एका चाहत्याने कपिलला शो ऑफ एअर का होत आहे? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना कपिलने लिहिले की, जेणेकरून मी घरी राहून पत्नी गिन्नीसह आमच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करू शकेल.
Bcoz I need be there at home with my wife to welcome our second baby ???????? https://t.co/wdy8Drv355
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) January 28, 2021
कपिलच्या या उत्तरानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मीडियामध्ये गिन्नीच्या प्रेग्नंसीबाबत अनेक शक्यता वर्तवण्यात येत होत्या. परंतु आता खुद्द कपिलने बाबा होण्याच्या वृत्तावर मोहर लावली आहे.
कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांचा 12 डिसेंबर, 2018 रोजी पंजाबच्या जालंधरमध्ये विवाह झाला होता. कपिलला एक मुलगी असून डिसेंबर 2019 मध्ये तीचा जन्म झाला होता.
The Kapil Sharma Show हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम येत्या काही दिवसांत प्रेक्षकांपासून दुरावणार आहे. हा कार्यक्रम जरी पुढील महिन्यात बंद होणार असला तरीही यामागची कारणं मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत. निर्मिती संस्था आणि वाहिनीनं अतिशय महत्त्वाच्या कारणांचा आढावा आणि निरिक्षणानंतर हा कार्यक्रम काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)