एक्स्प्लोर

कपिल शर्माची फसवणूक, कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांची बहिण अटकेत

कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांची बहिण कंचनला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. कॉमेडियन कपिल शर्माने दिलीप छाब्रियाच्या कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. कंचन ही दिलीप छाब्रिया यांच्या कंपनीची सीईओ आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांची बहिण कंचनला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. कंचन ही 'दिलीप छाब्रिया डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीची सीईओ आहे. हे प्रकरण कॉमेडियन कपिल शर्माच्या 2017 मधील व्हॅनिटी व्हॅनच्या ऑर्डरशी संबंधित आहे.

कपिलने 5.7 कोटी रुपये दिले कपिल शर्माने दिलीप छाब्रिया आणि त्याच्या कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. कपिलने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 2017 मध्ये मी दिलीप छाब्रिया यांच्या कंपनीला एक व्हॅनिटी व्हॅन डिझाईन करण्यासाठी 5.7 कोटी रुपये दिले होते. परंतु अजूनही ही व्हॅनिटी अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणात कंपनीसाठी सीनियर सेल्स एक्झिक्युटिव्हचं काम करणाऱ्या निहाल बजाजला ही अटक करण्यात आली आहे.

रेस्टॉरंटमधून अटक मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने कंचनला बुधवारी (27 जानेवारी) एक रेस्टॉरंटमधून अटक केली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कंचन अटकेपासून वाचण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होती. अखेर पोलिसांनी तिचं लोकेशन शोधून तिला मरिन ड्राईव्हजवळच्या एका रेस्टॉरंटमधून अटक केली आहे. तिला आणि निहाल बजाज यांना आज कोर्टात हजर केलं जाईल.

दिलीप छाब्रिया यांना मागील महिन्यात बेड्या मागील महिन्यात क्राईम इंटेलिजन्स युनिटने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर दिलीप छाब्रिया यांना अटक केली होती. त्यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल असून त्यात 100 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचाही समावेश आहे. त्याने बनवलेल्या अनेक गाड्यांची विविध आरटीओमध्ये बनावट नोंद केलं आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारावर फायनान्शियल कंपन्यांकडून कर्ज उचललं होतं. याशिवाय चेन्नईच्या एका व्यक्तीने 25 कोटी रुपये आणि कपिल शर्माने 5.7 कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला
Uma Hrishikesh Diagnosed With Endometriosis Shares Post: मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण, इंडस्ट्री सोडून थेट परदेशात झाली शिफ्ट
मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण
Star Pravah Halad Rusli Kunku Hasla Serial: स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...
स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget