The Kapil Sharma Show | 'द कपिल शर्मा शो' घेणार प्रेक्षकांचा निरोप
विनोदवीर आणि त्यानंतर अभिनयाच्या विश्वात पदार्पण करणाऱ्या कपिल शर्मा यानं कलाविश्वात त्याचं वेगळं स्थान निर्माण केलं. 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमामुळे तर कपिलच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली.
![The Kapil Sharma Show | 'द कपिल शर्मा शो' घेणार प्रेक्षकांचा निरोप Bollywood actor comedian kapil sharmas the kapil sharma show will goes off air in february know the reason The Kapil Sharma Show | 'द कपिल शर्मा शो' घेणार प्रेक्षकांचा निरोप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/25151335/kapil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
The Kapil Sharma Show विनोदवीर कपिल शर्मा यानं कायमच चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला आहे. 'कॉमेडी नाईट्स...' असो किंवा मग सध्या सुरु असणारा 'द कपिल शर्मा शो', प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून कपिलनं आपली वेगळी छाप चाहत्यांच्या मनावर उमटवली आहे. असा हा विनोदवीर आता मात्र काही काळासाठी चाहत्यांचा निरोप घेणार आहे.
The Kapil Sharma Show हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम येत्या काही दिवसांत प्रेक्षकांपासून दुरावणार आहे. हा कार्यक्रम जरी पुढील महिन्यात बंद होणार असला तरीही यामागची कारणं मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत. निर्मिती संस्था आणि वाहिनीनं अतिशय महत्त्वाच्या कारणांचा आढावा आणि निरिक्षणानंतर हा कार्यक्रम काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कपिल शर्माच्या सूत्रसंचालनात साकारला जाणाऱ्या या कार्यक्रमातून किकू शारदा, कृष्णा अभिषेक, भारती सिंह, अर्चना पूरण सिंह असे कलाकारही झळकतात. पण, फेब्रुवारी महिन्यापासून मात्र हे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाहीत. 2018 मध्ये सुरु झालेल्या या कार्यक्रमाला दमदार कामगिरीनंतर आता काही काळासाठी अल्पविराम मिळणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला इतक्यातच कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याचा कोणताही बेत ठरलेला नाही. कपिलच्या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमागे अनेक कारणं होती. प्रेक्षकांचा सहभाग हा घटकही कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत होता.
उत्तर भारत गोठला; देशात वाढणार शीतलहरीचा कहर
सध्या मात्र कोरोना काळामुळं लाईव्ह प्रेक्षकांची उपस्थिती नाही, चित्रपटही बेतानंच प्रदर्शित केले जात असल्यामुळं कलाकारांचीही कार्यक्रमाला उपस्थिती कमीच आहे. त्यामुळं आता कार्यक्रमाला अल्पविराम देत काही काळानंतर परिस्थिती पूर्ववत आल्यानंतरच पुन्हा कार्यक्रम सुरु करण्याचा विचार केला जाईल. काही काळासाठी का असेना, पण कपिल शर्मा शो आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळं चाहत्यांध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)