South actor : वडीलांच्या विरोधात लग्न केलं अन् आता होणार विभक्त, लग्नाच्या पाच वर्षांनी आणखी एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा संसार मोडला
South actor : तरुण राजकुमार आणि श्रीदेवी बायप्पा लग्नाच्या पाच वर्षानंतर वेगळे झाले. या अभिनेत्याने पत्नीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे.
![South actor : वडीलांच्या विरोधात लग्न केलं अन् आता होणार विभक्त, लग्नाच्या पाच वर्षांनी आणखी एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा संसार मोडला Kannada Actor Yuva Rajkumar Files Divorce Petition After 5 Years Of Marriage With Sridevi Byrappa Entertainment latest update detail marathi news South actor : वडीलांच्या विरोधात लग्न केलं अन् आता होणार विभक्त, लग्नाच्या पाच वर्षांनी आणखी एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा संसार मोडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/4f692476b2c62c3b993d7eecb4cb4da91718028081619720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
South actor : दिवंगत अभिनेते डॉ. राजकुमार यांचा नातू आणि अभिनेता राघवेंद्र राजकुमार यांचा मुलगा युवा राजकुमारच्या (Yuva Rajkumar) वैवाहिक आयुष्यात काहीही चांगलं सुरु नसल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहे.लग्नाच्या पाच वर्षानंतर अभिनेता आता त्याची पत्नी श्रीदेवी बायरप्पा हिला घटस्फोट देणार आहे. गेल्या एक वर्षापासून दोघांच्या वैवाहिक जीवनात वाद सुरू होता.
वृत्तांनुसार, युवा राजकुमार आणि श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांनी दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमध्ये काही सुधारणा न झाल्याने आता युवा राजकुमारने घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. पण यावर अद्याप श्रीदेवीकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाहीये.
युवाच्या सिनेमा रिलीजच्या वेळी श्रीदेवी दिसलीच नाही
युवा राजकुमार आणि श्रीदेवी बायरप्पा या दोघांनी 26 मे 2019 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर बराच काळ या दोघांमध्ये तणाव असल्याचं म्हटलं जात आहे. पण असे असूनही युवाच्या सिनेमाच्या मुहूर्ताला हे दोघे एकत्र दिसले होते. पण त्याच्या फिल्म रिलीजला मात्र श्रीदेवी हजर नव्हती.
View this post on Instagram
अभिनेत्याने पत्नीवर केला 'हा' आरोप
युवा राजकुमारने घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. यावरूनच या अभिनेत्याने आता पत्नीसोबतचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान युवाने त्याची पत्नी श्रीदेवी हिच्यावर मानसिक त्रास देत असल्याचा आरोप घटस्फोटाच्या याचिकेत केला आहे. पण अद्याप या दोघांमधील वादाचे खरे कारण समोर आलेलं नाहीये.
वडिलांच्या विरोधात जाऊन केलं होतं श्रीदेवी सोबत लग्न
एशियानेट न्यूजनुसार, अभिनेता आणि श्रीदेवी बायरप्पा यांनी श्रीदेवी बायरप्पाच्या वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं.दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांनी या जोडप्याला पाठिंबा दिला आणि त्यांचे लग्न लावून दिले होते. पण आता या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)