Kanika Kapoor: 'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Kanika Kapoor Divorce: कनिका कपूरचा दुसरा घटस्फोट झाला; लग्नाच्या 4 वर्षांनंतर दुसऱ्या नवऱ्याला दिला काडीमोड

Kanika Kapoor and Gautam Hathiramani: 'बेबी डॉल' (Baby Doll) या गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेली गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचं दुसऱ्यांदाही लग्न मोडलं आहे. सिंगरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौतम हाथीरमानीसोबत (Gautam Hathiramani) काडीमोड घेत असल्याचं सांगितलं. कनिकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन याची माहिती दिली. दोघांनीही परस्पर संमतीने निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. दरम्यान, अभिनेत्रीने आपल्या पोस्टद्वारे प्रायव्हेसी देखील मागितली आहे. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून, अभिनेत्रीने असं पाऊल का उचललं? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.
कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्याकडून काडीमोड घेतला (Kanika Kapoor and Gautam Hathiramani gets seprate)
गायिकेनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'खूप विचार करुन, मी आणि माझ्या पतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही जे काही एकत्र वेळ घालवला आहे, यासाठी मी आभारी आहे. मी गौतमला उत्तम भविष्यासाठी शुभेच्छा देते. मी सर्वांना विनंती करते की, आमच्या प्रायव्हेसीचा आदर ठेवण्यात यावा. कृपया आमच्याप्रति प्रेमळ आणि समजूतदार राहा', असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कनिकाचं दुसरं लग्नही मोडलं, हे ऐकून कनिकाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. विभक्त होण्याचा निर्णय गायिकेनं का घेतला? असा सवाल तिचे चाहते उपस्थित करत आहेत. 2022 रोजी गायिकेनं अगदी धुमधडाक्यात NRI बिझनेसमन गौतमसोबत लग्न केलं होतं.
गौतम आधी कनिकाने 1998 साली NRI डॉक्टर राज चंदोक यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. 2012 साली दोघांनीही काडीमोड घेतला. कनिकाला राज यांच्याकडून 3 मुलं आहेत. दोन मुली आणि एक मुलगा आहे. कनिकाचं पहिलं लग्न कमी वयात झालं होतं. 25 व्या वयापर्यंत गायिकेला 3 मुलं होती. तिने सिंगल मदर होऊन आपल्या मुलांचा सांभाळ केला. दुसऱ्यांदा काडीमोड झाल्याकारणाने कनिका पूर्णपणे खचून गेली आहे. ती सध्या मुंबईत असून, आपल्या तिन्ही मुलांचा सांभाळ करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कनिका कपूर आणि गौतम हाथीरमानी हे एकमेकांना बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत आहेत. पहिले त्यांच्यात मैत्री झाली. नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. कनिका कपूरच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्या, तिने आपल्या कारकिर्दीच बऱ्याच बॉलिवूड हिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















