Bigg Boss Fame Janhvi Killekar: 'असं वाटलं, मी आता मरणार'; डिलिव्हरीनंतर जान्हवी किल्लेकरला झालेला गंभीर आजार, मृत्यूशी झूंज कशी दिली?
Janhvi Killekar: जान्हवी किल्लेकरची डिलिव्हरीनंतर मृत्यूशी झूंज, अभिनेत्रीसोबत काय घडलं?

Janhvi Killekar on Brain Clots: 'बिग बॉस मराठी'मुळे (Bigg Boss) अभिनेत्री जान्हवी किल्लेकरला (Janhvi Killekar) विशेष ओळख मिळाली. अभिनेत्री सोशल मीडियात (Social Media) सक्रिय असते. जान्हवीचे फोटोस आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. तिने आपल्या कारकिर्दीत मालिकांमध्ये काम केलंय. सध्या अभिनेत्रीने व्यवसायातही पाऊल ठेवलं आहे. जान्हवी किल्लेकरला (Bigg boss Janhvi Killekar) एक मुलगा देखील आहे. Ishan Killekar असे तिच्या लेकाचे नाव असून, अभिनेत्री आपल्या मुलासोबतचे काही पोस्ट शेअर करते. जान्हवीने अलिकडेच डिलिव्हरीनंतर मृत्यूशी झूंज कशी दिली? याबद्दलचा एक किस्सा मुलाखतीत शेअर केला.
जान्हवी किल्लेकरची मृत्यूशी झूंज, डिलिव्हरीनंतर अभिनेत्रीसोबत काय घडलं? (Janhvi Killekar Reveals Near Death Experience)
जान्हवी किल्लेकरने अलिकडेच राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अभिनेत्रीने डिलिव्हरीनंतरचा एक किस्सा सांगितला. अभिनेत्री म्हणाली की, 'मला Brain Clotsचा त्रास झाला होता. तेव्हा माझा मुलगा Ishan दीड - दोन वर्षांचा होता. मी अॅडमिट होते. Ishanचा सांभाळ तेव्हा जावांनी केला. 'आई माझी काळूबाई' ही मालिका माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. त्याच्यानंतर चांगल्या गोष्टी घडत गेल्या. घर सोडून दीड - 2 वर्ष साताऱ्याला राहणं सोपी गोष्ट नव्हती. त्यात Ishan लहान होता. त्याला सोडून गेले होते. फॅमिली सोबत होती, म्हणून हे सगळं शक्य झालं'.
'कुटुंब आहे म्हणूनच सगळं शक्य झालं आहे. आजही मी जे काही बिनधास्त फिरते, ते सगळं माझ्या कुटुंबामुळेच. मालिका शूट करण्याआधी, म्हणजे डिलिव्हरीनंतर मी आयसीयूमध्ये होते. तेव्हा Ishanला कुटुंबियांनी सांभाळलं. तो खूप लहान होता. त्याला सोडून जाणं खूप अवघड होतं. त्यावेळेस मला असं वाटलं की, मी आता मरणार आहे. कारण माझा ब्रेन बंद पडला होता. क्लॉट अडकल्यामुळे ब्रेनचं ब्लड सर्क्यूलेशन बंद व्हायचं. मी म्हटलं की, आता मी संपले. Ishanचं टेन्शन होतं. पण म्हटलं घरातले आहेत, इशानला सांभाळतील. मी सुदैवाने वाचले'.
'अडचणींमध्ये आम्ही कुटुंब एकत्र येतो. आम्ही एकत्र मार्ग काढतो. लहान गोष्टी घडल्या तरी आम्ही संपूर्ण फॅमिली एकत्र येतो', असं जान्हवी किल्लेकर म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























