TMKOC Tanuj Mahashabde Iyer Bhai: 'आईसारखं कुणी नाही...'; 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अय्यर भाई आईंच्या आठवणीत भावूक, पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले...
Tanuj Mahashabde on Mother: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अय्यर भाई आईंच्या आठवणीत झाले भावूक.

Tanuj Mahashabde on Mother: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Tarak Mehta ka Ooltah Chashma) या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कलाकार तनुज महाशब्दे (Tanuj Mahashabde) यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं. तनुज महाशब्दे यांना खरी ओळख 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतून मिळाली. या मालिकेत त्यांनी 'बबिता' या पात्राचा नवरा 'अय्यर भाई' (Iyer Bhai) यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेमुळे त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला. 'आई सारखं कुणी नाही', असं म्हणत त्यांचे डोळे पाणावले.
तनुज महाशब्दे यांनी आईच्या आठवणींना दिला उजाळा (Tarak Mehta ka Ooltah Chashma Fame Tanuj Mahashabde Gets Emotional)
तनुज महाशब्दे यांनी अलिकडेच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्यातील खडतर प्रवासाबद्दल सांगितलं. यावेळी तनुज महाशब्दे यांनी आपल्या आईसोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला. आपल्या आईंबद्दल बोलताना तनुज महाशब्दे भावूक झाले असल्याचं पाहायला मिळालं. तनुज महाशब्दे म्हणाले की, 'लहानपणीच स्वप्न बघितलं होतं. छोट्या छोट्या नाटकांमध्ये काम करत होतो. घरात थोडी गरिबी होती. स्ट्रगल खूप केलं. आई - वडिलांची साथ लाभली'.
'गेली 10 वर्ष मला आई सोडून गेली. अनेक आठवणी आहेत. तिच्या आशीर्वादाने प्रवास सुरू आहे. बघू आता पुढे कसं काय होईल. आतापर्यंत मला असं वाटतं की, जे काही मी काम केलं आहे. लोकांना ते काम आवडलं आहे, ते आईचे आशीर्वाद आणि लोकांचे उपकार आहेत. ते मी कधीही विसरणार नाही. मला कधी पण आईबद्दल विचारलं तर, मला तिची खूप आठवण येते. आई म्हणजे आई असते. आईसारखं कुणी नाही. कधीच कुणी होऊ शकत नाही'.
'किती पण मी आनंद साजरा केला, नवीन घरात शिफ्ट झालो. सर्वाच आधी घरात आईचा फोटो लावला. आईच्या फोटोसमोर म्हणालो की, हे तुझं घर आहे, माझं नाही. नवीन गाडी घेतली, आधी तिचं नाव लिहिणार. ही गाडी तुझी आहे, माझी नाही, असं मी तिला म्हणालो. एवढं घट्ट नातं, माझं माझ्या आईसोबत आहे. आसिफ भाई यांना धन्यवाद देऊ इच्छितो. कारण आईला आजार होता. तेव्हा माझ्याकडे जर पैसे नसते, तर आईला मी 15-20 वर्षांपूर्वीच गमावलं असतं', असं तनुज महाशब्दे म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















