'मी लांबून बघितलेले प्रवीण तरडे आणि...', प्रवीण तरडेंबाबर धनंजय पोवारची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Dhananjay Powar On Pravin Tarde: डीपी दादा एका आगामी मराठी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात डीपी दादा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. राम खाटमोडे, सागर पाठक दिग्दर्शित सिनेमात अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

Dhananjay Powar On Pravin Tarde: 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार (Dhananjay Powar) सोशल मीडियावर चर्चेत असतो. आपल्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखला जाणारा धनंजय पोवार, म्हणजेच डीपी दादा, सध्या त्यानं केलेल्या एका नव्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. धनंजय पोवारनं प्रवीण तरडेंसोबतचा (Pravin Tarde) फोटो शेअर केला आहे. यामधून त्यानं त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. तसेच, प्रवीण तरडेंचं कौतुकही केलंय. धनंजय पोवारनं प्रवीण तरडेंचा उल्लेख करत मी लांबून बघितलेले प्रवीण तरडे आणि सोबत काम करताना पाहिलेले प्रवीण तरडे अविश्वसनीय असे आहेत, असं म्हटलंय.
डीपी दादा एका आगामी मराठी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात डीपी दादा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. राम खाटमोडे, सागर पाठक दिग्दर्शित सिनेमात अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
धनंजय पोवार इन्स्टा पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाला? (Dhananjay Powar On Pravin Tarde)
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार इन्स्टा पोस्टमध्ये म्हणालाय की, "सरांबरोबर काम करत असताना इतक्या गोष्टी शिकायला मिळतात; म्हणजे सरांचा अभ्यास आणि अभिनय, सरांची अभिनय करण्याची पद्धत, अभिनय करत असताना सगळ्ळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची पद्धत... म्हणजे खूप काही शिकायला मिळतं. व्यक्ती जितकी कठोर दिसते ना, त्याहीपेक्षा ती किती मायाळू आहे, प्रत्येक लहान-मोठ्या कलाकाराचा सन्मान करणारी आहे हे यात दिसतं. प्रत्येक कलाकाराबद्दल त्यांच्या मनामध्ये इतकं प्रेम आहे! मी लांबून बघितलेले प्रवीण तरडे आणि सोबत काम करताना पाहिलेले प्रवीण तरडे अविश्वसनीय असे आहेत..."
View this post on Instagram
अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिल्यानंतर घडलेल्या एका चित्तथरारक घटनेवर आधारीत सिनेमा 'जय श्री राम'च्या शूटिंगला सुरुवात झाली, अशा कॅप्शनसह सिनेमाच्या टिममधल्या अनेकांनी सेटवरचे काही फोटोही शेअर केले आहेत.
दरम्यान, धनंजय पोवार आगामी 'जय श्रीराम' सिनेमात झळकणार असून, राम खाटमोडे, सागर पाठक दिग्दर्शित सिनेमातून तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. प्रवीण तरडेंनीही सोशल मीडियावरुन सिनेमाच्या टीमला सुभेच्छा दिल्या आहेत. सिनेमाचा मुहूर्त पार पडताना ते तिथे उपस्थित होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















