मोरासमोर डान्स, झाडावरच्या कैऱ्या तोडल्या, कंगना राणौतने शेअर केलं रील VIDEO
Kangana Ranaut : मोरासमोर डान्स, झाडावरच्या कैऱ्या तोडल्या, कंगना राणौतने शेअर केलं रील

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मोरासमोर नृत्य करताना आणि झाडावरून कैऱ्या तोडताना दिसते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
कंगनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती पारंपरिक पोशाखात, निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने नृत्य करताना दिसते. त्यानंतर ती झाडावर चढून कैऱ्या तोडताना पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येतो. कंगनाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे आणि त्यांनी तिचे कौतुक केले आहे. कंगनाने हा व्हिडीओ निसर्गरम्य वातावरणात शेअर केलाय.
View this post on Instagram
कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. तसेच, सध्या तिने हिमाचल प्रदेशातील मनाली येथे 'द माउंटन स्टोरी' नावाचे कॅफे सुरू केले आहे, जे तिच्या हिमाचली संस्कृतीचे प्रतीक आहे. कंगनाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल झालाय. चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेट्सचा पाऊस पाडलाय.
कंगना रणौत लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'Blessed Be the Evil' या हॉरर ड्रामामध्ये ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत टायलर पोसी आणि स्कार्लेट रोझ स्टॅलोन हे कलाकारही असतील. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग रुद्रा करत आहेत, तर गाथा तिवारी यांनी पटकथा लिहिली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण न्यू यॉर्कमध्ये होणार आहे.
कंगना रणौत तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. अलीकडेच, पाकिस्तानच्या अभिनेत्री मिशी खानने कंगनावर टीका केली, ज्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला .
इतर महत्त्वाच्या बातम्या























