Kamaal Khan on Baba Siddique : 'जैसी करनी वैसी भरनी, न जाणे किती लोकांच्या प्रॉपर्टी जबरदस्तीने हडपल्या होत्या...,' बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर कमाल खानची पोस्ट चर्चेत
Kamaal Khan on Baba Siddique : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कमाल खानची एक वादग्रस्त पोस्ट चर्चेत आली आहे.
Kamaal Khan on Baba Siddique : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची शनिवार 12 ऑक्टोबर रोजी वांद्र्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. इतकच नव्हे तर बॉलिवुडलाही मोठा धक्का बसला. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर बॉलिवुडमधूनही शोक व्यक्त केला जातोय. कारण त्यांचे अनेक मोठ्या सेलिब्रेटींसोबत अगदी जवळचे संबंध होते. पण असं सगळं असतानाच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता कमाल आर खानची (Kamaal R Khan) पोस्ट चर्चेत आली आहे.
बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या झाल्यानंतर कमाल खानने एक एक्स पोस्ट केली. त्यामुळे सोशल मीडियावर या पोस्टचा संबंध थेट बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी जोडण्यात आला. कारण बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर कमाल खानने ही पोस्ट केली आहे. सध्या कमला खानच्या या पोस्टची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.
कमाल खानने नेमकं काय म्हटलं?
कमाल खानने एक्स पोस्ट करत म्हटलं की, 'जैसी करनी वैसी भरनी... किती जणांच्या प्रॉपर्टी बळजबरीने हडप केल्या होत्या कुणास ठाऊक... कमाल खानची ही पोस्ट सध्या बरीच वादग्रस्त ठरली आहे. अनेकांनी यावर कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.
बाबा सिद्दीकी यांची हत्या...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर काल(शनिवारी) गोळीबार झाला. या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी (Baba Siddique)यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Jaisi Karni Waisi Bharni. Na Jaane Kitne Logon Ki Property Par Zabardasti Kabza Kiya Huwa Tha. Kutte Ki Maut Mara! Aaj Un Sab Majloom Logon Ko Sukoon Mila Hoga!
— KRK (@kamaalrkhan) October 12, 2024
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी
बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा. मात्र, गोळीबारा वेळी हा पोलीस कर्मचारी कुठे होता आणि नेमके काय घडले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
ही बातमी वाचा :
Santosh Juvekar : संतोष जुवेकरचा खतरनाक ‘रानटी’अंदाज, नेमकं कारण काय?