सोशल मीडियावर अजय देवगणचे ढीगभर डुप्लिकेट, काजोल प्रतिक्रिया देताना म्हणाली...
Kajol reacts on duplicates of Ajay Devgn : अभिनेत्री काजोलने सोशल मीडियावरील डुप्लिकेट अजय देवगणबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Kajol reacts on duplicates of Ajay Devgn : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचे 90 च्या दशकातील सिनेमे आज देखील तेवढेच लोकप्रिय आहेत. त्याची हेअर स्टाईल असो किंवा वाकडी मान करुन केलेला अभिनय असो लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. मात्र, गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर अनेक डुप्लिकेट अजय देवगण पाहायला मिळाले आहेत. थोडेफार अजय देवगण सारखे दिसणारे अनेक लोक सोशल मीडियावर त्याच्या गाण्यांवर अभिनय करताना पाहायला मिळतात. याबाबत आता अजय देवगणची पत्नी आणि अभिनेत्री काजोल हिने प्रतिक्रिया दिली आहे.
एक लाईन इंटरनेटवर फेमस आहे. ती म्हणजे, देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. त्यातील 2 कोटी तर अजय देवगणचे डुप्लिकेट आहेत. असा प्रश्न काजोलला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर काजोल म्हणाली, "कुठे आहेत हे? माझ्या घराच्या समोर तर नाहीयेत. अजय इथे येईल तेव्हा त्याला हा प्रश्न विचारा.. त्याला तुम्ही विचारणार नाहीत. कारण सिंघमची सटकेल. आमच्या फिडवर हे लोक आलेला नाहीत." दरम्यान, अजय देवगणच्या डुप्लिकेट लोकांचे फोटो दाखवल्यानंतर सुंदर म्हणून काजोलने प्रतिक्रिया देखील दिली आहे. शिवाय यावेळी तिच्या चेहऱ्यावर हास्य देखील पाहायला मिळालं.
View this post on Instagram
'माँ' सिनेमात झळकली काजोल, 'सन ऑफ सरदार 2' मध्ये दिसणार अजय देवगण
प्रोफेशनल फ्रंटबाबत बोलायचं झालं, तर काजोल अलीकडेच रिलीज झालेल्या 'माँ' या चित्रपटात झळकली, जो थेटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अजय देवगणने प्रोड्यूस केला आहे. अजय लवकरच 'सन ऑफ सरदार 2' या चित्रपटात झळकणार आहे.
काजोल पुढे बोलताना म्हणाली, “माझं नाव माझ्या आजीनं ठेवलं होतं. त्यांनी एका डायरीत सगळ्यांची नावं लिहून ठेवली होती की, ‘माझ्या मोठ्या मुलाला एक मुलगी होईल आणि तिचं नाव काजोल असेल. माझ्या धाकट्या मुलाला एक मुलगा होईल आणि त्याचं नाव सम्राट असेल.’ आजीनं डायरीत सगळ्यांची नावं लिहिली होती. कोणाला मुलगा होईल, कोणाला मुलगी होईल, हे सुद्धा लिहिलं होतं आणि त्यांची नावं काय असतील, तेही नमूद केलं होतं.”
इतर महत्त्वाच्या बातम्या























