Bollywood Actress Struggle Life: कधीकाळी ऐश्वर्या रायला द्यायची टक्कर, आता ग्लॅमरस जग सोडून जगतेय सन्यासाचं जीवन, बौद्ध भिक्षू बनलीय 'ही' अभिनेत्री
Bollywood Actress Struggle Life: आता कधीकाळी बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री संन्यासी म्हणून जीवन जगतेय. चित्रपट जगतातलं एकेकाळचं प्रसिद्ध नाव असलेली ही अभिनेत्री आज बौद्ध भिक्षू म्हणून आयुष्य जगतेय.

Bollywood Actress Struggle Life: बॉलिवूडचं झगमगतं जग नेहमीच अनेक कलाकारांना आकर्षिक करत असतं. पण, काही स्टार्स असे आहेत, जे या जगात पाऊल ठेवतात, यशाचं सर्वोच्च शिखर गाठतात, पण अचानक सगळं काही सोडून दूर कुठेतरी निघून जातात. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीची कहाणी सांगणार आहोत, जिनं स्वतःच्या इच्छेनं, करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असूनही ग्लॅमरस जग सोडलं आणि तिनं असा मार्ग निवडला ज्याची सामान्य लोक कल्पनाही करू शकत नाहीत, तो मार्ग म्हणजे, धर्म आणि साधनेचा. म्हणजेच, अभिनेत्रीनं अध्यात्माचा मार्ग निवडला. आता कधीकाळी बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री संन्यासी म्हणून जीवन जगतेय. चित्रपट जगतातलं एकेकाळचं प्रसिद्ध नाव असलेली ही अभिनेत्री आज बौद्ध भिक्षू म्हणून आयुष्य जगतेय.
'मिस इंडिया' स्पर्धेत ऐश्वर्या रायशी झालेली टक्कर
आम्ही तुम्हाला ज्या अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, तिचं नाव बरखा मदन (Barkha Madan). एक मॉडेल, ब्युटी क्वीन आणि कधीकाळची बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री असलेली बरखानं अचानक बॉलिवूडमधून एग्झिट घेतली. एवढंच नाहीतर, अभिनेत्रीनं तिचं नावंही बदललं आणि आज तिला 'ग्याल्टेन सामतेन' (Gyalten Samten) म्हणून ओळखलं जातं. बरखानं 1994 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतलेला. ज्यावेळी बराखा या स्पर्धेत सहभागी झालेली, त्याचवेळी सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय या दोघीही या स्पर्धेत सहभागी झालेल्या. पण, बरखाला 'मिस इंडिया'चा खिताब पटकावता आला नाही. या स्पर्धेची विजेती ऐश्वर्या राय ठरली आणि उपविजेती सुष्मिता सेन ठरली. पण, त्यानंतर बरखानं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि इंडस्ट्रीत मात्र तिनं ऐश्वर्या आणि सुष्मितालाही मागे टाकलं. त्यानंतर बरखानं 'मिस टुरिझम इंडिया'चा खिताब जिंकला.
फिल्म्स आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत करिअर
बरखानं आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 1996 मध्ये फिल्म 'खिलाड़ियों का खिलाड़ी'मधून केली, ज्यामध्ये अक्षय कुमार, रेखा आणि रवीना टंडन यांसारखे स्टार्स होते. ही फिल्म हिट ठरली. यानंतर 2003 मध्ये तिनं राम गोपाल वर्माची सुपरनॅच्युरल थ्रिलर 'भूत'मध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. ज्यामध्ये तिनं 'मनजीत खोसला' या आत्म्याची भूमिका साकारून प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचंही लक्ष वेधून घेतलं. दरम्यान, ती 'न्याय' या सामाजिक मालिकेसारख्या आणि '1957 क्रांती' या ऐतिहासिक मालिकेतही दिसली, ज्यामध्ये तिनं राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली होती. नंतर ती 'साथ फेरे - सलोनी का सफर' सारख्या लोकप्रिय मालिकेचा भाग होती, जी 2005 ते 2009 पर्यंत चालली.
आधी निर्माती झाली अन् मग बौद्ध धर्म स्विकारला...
2010 मध्ये, बरखानं निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि 'गोल्डन गेट एलएलसी' नावाची स्वतःची कंपनी सुरू केली, ज्या अंतर्गत तिनं 'सोच लो' आणि 'सुरखब' सारख्या स्वतंत्र चित्रपटांची निर्मिती केली आणि स्वतःच अभिनयही केला. बरखा बऱ्याच काळापासून दलाई लामांची अनुयायी आहे. 2012 मध्ये, तिनं अधिकृतपणे बौद्ध धर्म स्वीकारला आणि संन्यास घेतला. गेल्या 13 वर्षांपासून, ती ग्लॅमर आणि कॅमेऱ्यांच्या दुनियेपासून दूर, हिमाचल आणि लडाखसारख्या शांत ठिकाणी संन्यासी म्हणून राहत आहे. बरखा मदनचं हे नवं जीवन अशा काही लोकांसाठी एक उदाहरण आहे, जे ग्लॅमरपेक्षा जीवनातील खरी शांती आणि समाधानाला प्राधान्य देतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























